आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? असा प्रश्न नेहमीच घराच्यांपुढे असतो. अनेक जणांचे सल्ले घेऊन झाल्यानंतर बारशाचा समारंभ आयोजित करून बाळाचं नामकरण करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. त्यामध्ये आपल्याकडे आजी-आजोबा, एखादा पूर्वज किंवा नट-नट्यांच्या नावावरून बाळाचे नाव ठेवायला लोकांना फारच आवडते. मात्र, गुजरातमध्ये एका आईने आपल्या नवजात तिळ्या मुलींची नावे ‘जीएसटी’च्या आद्यक्षरांवरून ठेवली आहेत.

‘स्पॅम कॉल’ टाळून तुम्ही वाचवू शकता कोट्यवधी रुपये

गुजरातमधली सुरत येथे राहणाऱ्या कांचन पटेल नावाच्या महिलेने काही दिवसांपूर्वी तिळ्या मुलींना जन्म दिला होता. आपल्या मुलींना विशेष ओळख देण्यासाठी त्यांनी या मुलींची नावं जीएसटीच्या आद्यक्षरांवरून ठेवली. या तिन्ही मुलींचं नामकरण गारावी (जी), सांची(एस) आणि तारावी(टी) असं करण्यात आलंय. त्यामुळे नातेवाईक या मुलींना ‘जीएसटी’ नावानेच हाक मारायला लागले आहेत.

Viral Video : पितृपक्षात कावळ्याला बळजबरीने भरवला जातोय पिंड, सत्य मात्र वेगळंच

वस्तू व सेवा करामुळे प्रेरित होऊन आपण मुलींची नाव असं ठेवल्याचं कांचन यांनी सांगितलं. मुलांचं नाव ‘जीएसटी’ ठेवण्याची ही काही पहिलीच घटना नाही. राजस्थानमधल्या बिवा गावातील एका महिलेने देखील आपल्या मुलाचं नाव ‘जीएसटी’ ठेवलं होतं. ३० जूनच्या मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांनी तिच्या मुलाचा जन्म झाला. १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आली, तेव्हा या ऐतिहासिक दिवशी जन्मलेल्या मुलाचं नाव ‘जीएसटी’ ठेवण्याचा निर्णय त्याच्या आईने घेतला.