सगळ्यात जास्त रस्ते अपघात होणा-या देशांच्या यादीत भारतही आहे. येथील प्रत्येक शहरात दिवसाला रस्ते अपघातात शेकडोंनी माणसांचे जीव जातात असे अहवालात समोर आले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहाने ‘सावकाश चालवा’, ‘दारू पिऊन वाहने चालवू नका’ अशा अनेक सूचना रस्त्यांच्या दुतर्फा लावलेल्या असतात. पण वाहतूकीचे हे नियम फार कमी लोक पाळतात आणि त्यात नाहक त्यांचा किंवा समोरच्या व्यक्तीचा जीव जातो. अशीच हृदय पिळवटून टाकणारी एका अभागी पतीची पोस्ट व्हायरल होत आहे. बाईक चालवताना त्याची गर्भवती पत्नी तोल जाऊन पडली. यातच तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि आठवड्याभराने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे फेसबुकवरून या नव-याने वाहने सावकाश चालवण्याची कळकळीच विनंती केली आहे.

वाचा : मुलगा गुगलमध्ये इंजिनिअर, तर वडील गावात करतात मोलमजुरी

young man set fire to the shop in anger where the girlfriend was working
लाडकी प्रेयसी बोलेना, हळव्या प्रियकराचे डोके सटकले अन् त्याने दुकानच पेटवले…
Girgaon, murder, bicycle,
गिरगावमध्ये सायकलवरून झालेल्या वादातून हत्या
Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”

कार्तिक या चेन्नईमध्ये राहणा-या तरुणाचा उमा महेश्वरी हिच्याशी सहा महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. तर गेल्या नऊ वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. उमा ही पाच महिन्यांची गर्भवती होती. हे दोघेही बाईकने जात होते. उमाने सुरक्षेसाठी डोक्यात हेल्मेटही घातले नव्हते. त्यांच्या बाईकला अपघात झाला अन् उमाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ७ जानेवारीला हा अपघात झाला, त्यानंतर उमाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले. उमा आणि तिच्या होणा-या मुलाचा जीव गेला. कदाचित उमाने हेल्मेट घातले असते तर तिचा जीव वाचला असता. पण दैवाला हे मंजूर नव्हते. सहा महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याची नियतीने कायमची ताटातूट केली. जिच्यासोबत आपण नऊ वर्षे घालवली तिला एका चूकीमुळे गमावले याचे कार्तिकला खूप दु:ख झाले आणि अशी चुक कधीही न करण्याची विनंती त्याने फेसबुकवरून केली आहे.

हेल्मेट का घालावे? वाहने सावकाश का चालवावीत? सिग्नल का पाळावा? असे म्हणत आपण सर्रास नियम पायदळी तुटवतो. पण कधी कधी आपला हा निष्काळजी पण खरंच एखाद्याचा जीव घेऊ शकतो अशी पुसटशी कल्पनाही आपल्या मनाला शिवत नाही. कार्तिकच्या बाबतीच जे झाले ते दुर्दैवीच होते पण अशी चूक आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपणही घ्यायला हवी.