अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्लीच देशातील काही प्रसिद्ध पत्रकार आणि वृत्तनिवेदकांची ट्रम्प टॉवरमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकित त्यांनी पत्रकारांना आपले काही फोटो वापरण्यास मनाई केली आहे. पत्रकार नेहमीच आपल्याविषयी बातमी देताना खराब फोटो वापरतात असा ट्रम्प यांचा आक्षेप आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकन निवडणुकांच्या काळात अमेरिकेतील जवळपास सगळ्याच वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणत टिका झाली. अनेकांनी तर आपला ट्रम्प यांना विरोध असल्याचे जाहिर केले. पण नंतर डोनाल्ड ट्रम्प यांचीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमातल्या अनेक महत्त्वाच्या प्रतिनिधींना आपल्या ट्रम्प टॉवरमध्ये बोलावून घेतल्यानंतर सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली. अमेरिकेतल्या वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्र बातमी देतात दुहेरी हनुवटी असलेलाच आपला फोटो वापरतात असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. म्हणूनच त्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. या फोटोंमुळे आपण कुरूप दिसत असल्याने असे फोटो वापरून नका असे ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले असल्याचे ‘पॉलिटिको’ने म्हटले आहे.

वाचा : हॅकरच्या करामतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘ट्रम्प टॉवर’चे गुगलवर झाले ‘डम्प टॉवर’

अमेरिकन निवडणुकांच्या वेळी अनेक माध्यमांनी ट्रम्प यांच्यावर सडकून टिका केली होती. ट्रम्प यांच्या अनेक आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे माध्यमांमध्ये त्यांच्याविरोधात अनेक बातम्या छापून आल्या, त्यावेळी माध्यमांच्या भूमिकेवर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेतली माध्यमे जाणून बुझून माझ्यावर चुकीचे आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली होती.