नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसांना त्रास सहन करावा लागत असताना आता याचा मोठा फटका विदेशी पर्यकांना देखील बसला आहे. डिसेंबरच्या महिन्यात अनेक विदेशी पर्यटक भारतात येतात. भारतात आलेल्या स्वीडनच्या पर्यटकांना देखील नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागत असून खर्चासाठी त्यांच्याजवळ पैसे नाहित.  त्यामुळे, रस्त्यात गाणी गाऊन, लोकांचे मनोरंजन करून या विदेशी पर्यटकांनी दिल्लीपर्यंतच्या प्रवासासाठी पैसे गोळा केले आहे.

वाचा : बँक व्यवस्थापकाने स्वत:च्या खिशातून अंत्यसंस्कारासाठी ग्राहकाला दिले पैसे

जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स यासारख्या देशांतून काही विदेशी पर्यटक राजस्थानमध्ये ‘पुष्कर फेस्टीव्हल’साठी आले होते. यातले काही पर्यटक ८ नोव्हेंबरला राजस्थानमध्ये आले होते. अशी माहिती ‘द हिंदुस्तान टाईम्स’ने दिली. याच दिवशी मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहिर केला. त्यामुळे, या विदेशी पर्यटकांचे चांगलेच हाल झालेत. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्याने त्यांच्याकडे खर्चाला पैसे नव्हते. अशातच कोणीही जुन्या नोटा घेत नसल्याने या विदेशी पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच भारतात राहण्याचा खर्च भागवण्यासाठी यातल्या काही विदेशी नागरिकांनी पुष्करच्या रस्त्यांवर लोकांचे मनोरंजन करत खर्चासाठी पैसे मिळण्याचा मार्ग स्वीकारला. ‘नोटाबंदीमुळे पैशांची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे आम्हाला मदत करा.’ अशी पाटी त्यांनी सोबत ठेवली आणि पुष्करमधल्या ब्रम्हा मंदिराच्या परिसरात करमणूक करत त्यांनी पैसे गोळा केले आहे. त्यांना दिल्ली परतायचे आहे.

वाचा : नोटाबंदीनंतर मंदिरात दानपेटीऐवजी ‘स्वाईप मशीन’!

नोटांबदीच्या निर्णयाला आता एक महिला उलटेल तरी हा त्रास कमी झालेला नाही. अनेकांना पैशांची चणचण भासत आहे. काही दिवसांपूर्वी गोव्याच्या एअरपोर्टवरही एका विदेशी महिलेला असाच त्रास सहन करावा लागला होता. नोटाबंदीच्या निर्णयाची या महिलेला कोणतीही कल्पना नव्हती. अशावेळी एक भारतीयाने व्यक्तीने तिची मदत केली होती.