व्हॅलेंटाइन डे होऊन आठवडा उलटला पण याविषयीच्या बातम्या काही संपल्या नाही. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी दोन हजारांच्या नोटांनी गाडी सजवली होती अशा बातमीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.  नंतर ही अफवा निघाली ही गोष्ट वेगळी. आता आणखी एका रोमियोची चर्चा होत आहे. या रोमियोने आपल्या सोबत डेटला येणा-या मुलीला नवा कोरा आयफोन ७, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण आणि आलिशान ऑडिने सफर अशा एकापेक्षा एक ऑफर दिल्या.

Viral Video : जादू शिकण्याच्या चार सोप्या ट्रिक्स

वाचा : घर की खुराडा? तरीही लोक देतात २० हजार घरभाडे

गुडगावमधल्या या तरूणाने दिलेल्या ऑफरला भुलून २ हजार मुलींनी त्याची व्हॅलेंटाइन डेट होण्यासाठी अर्जही केले होते. यातल्या पाच मुलींना घेऊन तो डेटवरही गेला होता. याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुडगावमधल्या शकुल गुप्ता याने ११ फेब्रुवारीला फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. आपल्या सोबत व्हॅलेंटाइन डेटला येणा-या मुलीला आयफोन ७ आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनर डेटचे वचन दिले होते, आश्चर्य म्हणजे अनेक मुलींनी त्याला प्रतिसाद देत त्याच्यासोबत डेटला जाण्याची इच्छाही व्यक्त केली. जवळपास २ हजार मुलींमधून ५ मुलींना घेऊन तो डेटला गेला. याचे फोटोही त्याने फेसबुकवर शेअर केले आणि वचन दिल्याप्रमाणे या मुलींना नवे कोरे आयफोनही गिफ्ट केले. आता या प्रकरणावर प्रतिक्रिया आल्यानंतर त्याने ही पोस्ट फेसबुक अकाऊंटवरून डिलिट करण्यात आली.