आपण माणसं किती क्रूर असतो ना, इथे एखादा अपघात झाला की त्या माणसांचा जीव वाचवण्यापेक्षा आपण तिथून पळ काढतो. इथे अपघात झाल्यावर आपण माणसांचे प्राण वाचवू शकत नाही तिथे एखाद्या जनावराला धडक दिल्यानंतर त्याचे प्राण वाचवणं तर दूरच राहिलं. झिम्बाब्वेच्या अभयारण्यातला एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचंही काळीज पिळवटून निघेल.

अभयारण्यात सफारीला आलेल्या एका गाडीने हत्तीच्या काही महिन्यांपूर्वी जन्मलेल्या पिल्लाला धडक दिली. गाडीचा वेग हा खूपच जास्त होता. त्यामुळे ही धडक एवढी जोरात होती की हत्तीचं छोटसं पिल्लू खाली कोसळलं, त्याला उठताही येईना. त्याच्या आईनं या पिल्लाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण आपलं पिल्लू काही जगणार नाही याची खात्री होताच त्या आईनं आपले सारे प्रयत्न थांबवले आणि पिल्लाला तिथेच सोडून ती हत्तीच्या कळपासोबात आक्रोश करत निघून गेली.