मोठमोठ्या पाळण्यात बसून थरार अनुभवण्याची अनेकांना आवड असते. थरार आणि मज्जा असा दुहेरी अनुभव मोठमोठ्या पाळण्यात बसल्यावर घेता येतो. पण हा थरार अनुभवणं कधी कधी जीवावर देखील बेतू शकतं असाच एक वाईट अनुभव आहिओच्या जत्रेत आला. एका मोठ्या पाळण्यात बसून काही जण मज्जा लुटत होते. वर खाली हलणाऱ्या पाळण्यात बसून थरार अनुभवत लोकांची मज्जा सुरू होती. पण याच वेळी एक दुर्दैवी घटना घडली. हा पाळणा हवेत झोकावत असताना एका खांबाला त्याची जोरदार धडक बसली. या धडकेमुळे पाळण्याचा काही भाग थेट खालीच कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यूही झाला. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झालीय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो  अनेकांच्या  पाहून अंगावर काटा येईल.