सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणे हा जणू सध्या एकप्रकारचं स्टेटस सिम्बॉलच झाला आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींचे अपडेटस देण्याचे काम या माध्यमातून आपण अगदी सहज करत असतो. मात्र, आता तुमच्या सोशल मीडियावर आयकर विभागाचे लक्ष असणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या गाडीचे, घराचे किंवा इतर मोठ्या खरेदीचे फोटो शेअर केलेत तर आयकर विभागाचे कर्मचारी त्याबाबत विचारणा करण्यासाठी तुमच्या घरी येऊ शकतात.

Viral Video : पितृपक्षात कावळ्याला बळजबरीने भरवला जातोय पिंड, सत्य मात्र वेगळंच

इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर तुम्ही महागड्या वस्तूंचे फोटो टाकल्यास त्याची तपासणी केली जाणार आहे. काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे काम पुढील महिन्यापासून सुरु होणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये आयकर विभाग संबंधित व्यक्तीची सर्व माहिती आणि सोशल नेटवर्किंग साईटवरील माहिती पडताळणार आहे. त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा खर्च आणि घोषित उत्पन्नामधील फरक तपासून पाहिला जाईल.

‘स्पॅम कॉल’ टाळून तुम्ही वाचवू शकता कोट्यवधी रुपये

मोदी सरकारने काळा पैसा बाहेर यावा, यासाठी अनेक नवीन प्रयोग सुरु आहेत. त्याचप्रमाणे करचोरी रोखण्यासाठी आयकर विभागातर्फे हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आयकर विभागाने मागील वर्षी ‘प्रोजेक्ट इनसाईट’ च्या अंमलबजावणीसाठी एलअँडटी इन्फोटेकसोबत (L&T) करार केला होता. सध्या याचे बीटा परीक्षण सुरु असून पुढील महिन्यात त्याची सुरुवात होईल. या नव्या प्रयोगामुळे आयकर विभागाला नागरिकांच्या मोठ्या व्यवहारांची माहिती मिळेल आणि काळ्या पैशांवर निर्बंध आणण्यात मदत होईल.