‘कष्टकऱ्यांची, कामगारांची पिळवणूक होते, त्यांना मदत केली पाहिजे’ अशी वाक्यं पाच पाच मिनिटांनी बोलणारी लोकं त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात अनेकदा वेगळीच असतात. दुसऱ्यांना उपदेशाचे डोस पाजणाऱ्या हे महाभाग स्वत:च्या आयुष्यात मात्र कोरडे पाषाण असल्याच दिसून येतं.

हिमांशु भाटिया या भारतीय वंशाच्या महिला उद्योजकाला तिथल्या एका कोर्टाने तिच्या मोलकरणीला अमानूष वागणूक दिल्याबद्दल १ लाख ३५ हजार डॉलर्सचा (सुमारे ८७ लाख डॉलर्स) दंड ठोठावला आहे.

हिमांशु भाटिया य़ा भारतीय वंशाच्या उद्योजिकेने तिच्या घरी तिला मदत करण्यासाठी शीला नावाच्या भारतीय महिलेला काम दिलं होतं. तिला दर महिन्याकाठी ४०० डॉलर्सचा पगार ही महिला देत होती. याशिवाय तिच्या राहण्या-खाण्याचीही व्यवस्था ही महिला करत होती. इथवर सगळं ठिक होतं. पण शीलाला हिमांशु भाटिया प्रचंड मारझोड करायच्या. त्यांनी तिला दिलेली राहण्याची व्यवस्थाही काही ठिक नव्हती. शीला आजारी असताना त्यांना गॅरेजमध्ये झोपायला भाग पाडलं जायचं. एरव्हीही त्यांची रवानगी गॅरेजमध्ये व्हायची. चीड आणणारी बाब म्हणजे या गॅरेजमध्ये शीलाच्या अंथरूणाजवळ हिमांशु भाटिया यांच्या कुत्र्यांच्या झोपण्याची जागा होती.
हिमांशु भाटिया त्यांच्या मोलकरणीला देत असलेल्या त्रासाबाबत त्यांना भारतामध्येही कडक शिक्षा झाली असती. अमेरिकेत तर कामगार संरक्षण कायदे आणखीनच कडक आहेत. मोलकरीण शीलाच्या अशा छळाची दखल तिथल्या कोर्टाने घेत हिमांशु यांना ८७ लाख रूपयाचा दंड ठोठावला आहे.

VIRAL VIDEO: बिल्डिंगवरून पडणाऱ्या मोलकरणीला मदत देणं दूरच, पण व्हिडिओ रेकाॅर्ड केला

यामधला मोठा विरोधाभास म्हणजे आपल्या मोलकरणीचा छळ करणाऱ्या हिमांशु भाटियांची स्वत:ची ‘रोझ’ नावाची ‘स्टाफिंग सोल्युशन्स’ पुरवणारी कंपनी आहे. अनेक कंपन्यांना ही कंपनी मनुष्यबळ पुरवते. अशी कंपनी चालवणारी महिलाच जर आपल्या मोलकरणीला अशी वागणूक देत असेल तर ती ‘लोकां सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण याचं सदरात मोडते.’