सोशल मीडियावरील लोकप्रिय फेसबुकच्या माध्यमातून ‘स्पेसवॉक’चा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आतंरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर दोन अंतराळवीर देखील दिसत आहेत. अॅस्ट्रोनॉटससोबतच पृथ्वीचा नजारा देखील दिसत आहे. हा व्हिडिओ लाइव्ह स्वरुपात असल्याचे प्रमोशन केल्यामुळे या व्हिडिओला हजारो लोक पाहत आहेत. एवढेच नाही तर शेअर देखील करत आहेत. हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरवरुन चित्रित करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला होता. अमेरिकेतील नासा संस्थेने या व्हिडिओबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी कोणतेही ‘स्पेसवॉक’ नियोजित नसल्याचे नासाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लाइव्ह नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  नासा संस्थेच्या अधिकृत पेजवरुन देखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला नव्हता.

हा व्हिडिओस फेसबुकवर UNILAD, Viral USA आणि INTERESTINATE यासारख्या फेसबुक पेजवर दिसत आहे. या व्हिडिओने आतापर्यंत Viral USA च्या पेजबर तब्बल २ मिलियन लोकांनी पसंती दिली आहे. महत्वाचे म्हणजे यातील कोणतेही पेज अधिकृत नसताना लोक या व्हिडिओला पसंती देताना दिसले होते.  नासाच्या स्पष्टोक्ती व्यतिरिक्त युट्यूबवरील एका जून्या व्हिडिओमुळे हा व्हिडिओ लाइव्ह नसल्याचे निदर्शनास येते. २०१३ मध्ये चित्रित केलाला व्हिडिओ आणि आज दिवसभरात सोशल मीडियामध्ये लोकप्रिय झालेल्या व्हिडिओमध्ये समानता दिसून येते.

नासा (नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) ही अमेरिकेची अवकाश संशोधन करणारी जगविख्यात संस्था. ही संस्था अमेरिकेची असली तरी या संस्थेसाठी भारतासहित जगभरातील शास्त्रज्ञ काम करीत असतात. नासा वेगवेगळ्या अवकाश मोहिमा राबवत असते. याची माहिती किंवा संशोधनातील फोटो पाहण्यासाठी एक विशेष अॅपदेखील उपलब्ध आहे.

(https://play.google.com/store/apps/detailsAGid=gov.nasa) हे अ‍ॅप फोनवर इन्स्टॉल करून उघडल्यावर त्यात एकूण ९ भागांचा मेनू येतो. त्यातला पहिला भाग म्हणजे नासाच्या विविध उपग्रह किंवा यानांनी काढलेल्या १५००० पेक्षा अधिक छायाचित्रांचा खजिना तुम्ही पाहू शकता.