आज देशातच नाही तर जगातील अनेक ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन साजरा केला जात आहे. महात्मा गांधी यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान किमान भारतीयांना तर वेगळे सांगायला नको. स्वातंत्र्याच्या काळात सामान्यांवर गांधीजींचा जितका प्रभाव होता, तितका प्रभाव समकालीन कोणत्याही नेत्याचा नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्याचे बरेचसे श्रेय हे गांधीजींनाच दिले जाते. गांधीजींनी आपल्या बोलण्यातून आपली प्रतिमा तयार केली. त्यांच्या गोष्टी सामान्य माणसाला भिडणाऱ्या असल्याने लोकांवर त्यांचा प्रभाव पडला. काय आहेत त्यांच्या प्रभाव पाडणाऱ्या गोष्टी…

१. कमकुवत लोक कधीही माफी मागत नाहीत, तर क्षमा करणे हे ताकदवान असण्याचे लक्षण आहे.

२. असे जगा की तुमचा उद्या मृत्यू होणार आहे, असे काही शिका जसे तुम्ही अनेक वर्षे जगणार आहात

३. आधी ते तुमची उपेक्षा करतील, मग तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील त्यानंतरच तुम्ही जिंकाल.

४. व्यक्तीची ओळख ही त्याच्या कपड्यांवरुन नाही तर त्याच्या चारित्र्यावरुन होते.

५. चूक करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही.

६. एखाद्या गोष्टीत आपण अयशस्वी झालो तरीही आपण पुन्हा नव्याने उभे राहू शकतो. घाबरुन पळून जाण्यापेक्षा ते केव्हाही चांगले.

७. तुम्ही जो विचार करता आणि जे बोलता तेच करता असे जेव्हा होईल तेव्हाच तुम्ही सुखी व्हाल.

८. समुद्रातील पाण्याचे काही थेंब खराब असतील तर सगळा समुद्रच खराब होतो. माणुसकी ही सुद्धा समुद्राप्रमाणेच असते.

९. तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर लोकांची मदत करायला शिका.