सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सध्या एखादा व्यक्ती प्रकाश झोतात येणे आता अधिक सोपे झाले आहे. बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्री यांच्याविषयीची चर्चा सिमित न राहता आजच्या घडीला सामान्यातील सामान्य व्यक्तिसंदर्भात देखील नेटीझन्स चर्चा करताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वी चहा विकणाऱ्या पाकिस्तानी तरुणाच्या डोळ्यांची जादू पाहायला मिळाल्यानंतर आता हीच जादू सिंगापूरमधील एका अधिकाऱ्यांच्या बाबतीत दिसून येत आहे.
सिंगापूरमधील शांघा. विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या अधिकाऱ्याच्या सुंदरतेची चर्चा ट्विटर आणि फेसबुकवर रंगली आहे. या अधिकाऱ्याच्या फोटोवर अनेक तरुणी बिनधास्तपणे व्यक्त होताना दिसत आहे. ‘सर्टीस सिस्को’ नावाच्या सुरक्षा पुरविणाऱ्या कंपनीने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या २२ वर्षीय ली मीनवेईला मिळणाऱ्या लोकप्रियेतेची माहिती ट्विटरवरुन शेअर केली.’सर्टीस सिस्को’ कंपनीत ली मेनवेई हा अधिकारी पदावर कार्यरत आहे.

ट्विटरवर या अधिकाऱ्याचा फोटोला लोकप्रियता मिळत असल्यामुळे कंपनीने आपल्या या लोकप्रिय अधिकाऱ्याचे फोटो फेसबुकवर देखील शेअर केले. या तरुणाच्या आकर्षक आणि सुंदरतेविषयी फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तरुण अधिकाऱ्याची होणाऱ्या चर्चेमुळे काही तरुणी खास त्याच्या भेटीसाठी सिंगापूरची ट्रिपचे नियोजन करत आहेत.
आपल्याला मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळे तरुण अधिकारी भारावून गेला आहे. विशेष म्हणजे लाखो तरुणींना घायाल करणारा तरुण अधिकारी अजूनही सिंगल आहे. सोशल मीडियावर आपल्याला मिळणाऱ्या लोकप्रियेनंतर त्याने वैयक्तिक आयुष्यासंदर्भातील काही गोष्टी शेअर केल्या. यामध्ये त्याने सध्या करिअर शिवाय अन्य कोणतीही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची नसल्याचे म्हटले आहे.