भारत हा कृषीप्रधान देश असला तरी शेतीसाठी तितकंस पुढारलेलं तंत्रज्ञान अद्यापही गावागावात पोहोचलं नाही. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या पद्धती आणि थोडी सर्जनशीलता वापरून शेतकरी आपल्या शेतीच्या कामात सुधारणा करत आहे. याउलट विकसित देशातील शेतकऱ्यांच्या शेतावर थोडं वेगळंचं चित्र पाहायला मिळतं. तंत्रज्ञानाची कास धरून शेतकरी अधिकाधिक प्रगती करत आहे. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या शेतीच्या कामात मनुष्यबळ खर्च करण्यापेक्षा इथले शेतकरी सर्रास मशिन्सचा वापर करतात. अगदी शेतातून फळ तोडून आणल्यानंतर त्यांच्या आकारमान, वजन, गुणवत्ता पाहून वेगवेगळ्या गटात त्याची विभागणी करण्यासाठीदेखील वेगवेगळ्या प्रकारच्या मशिन्स असतात.

Video : जेव्हा छोटी झिवा ‘कॅप्टन कूल’ची काळजी घेते

वाचा : मुख्यमंत्र्यांनी केली पोलखोल, पाहा विमानतळावरील कर्मचारी प्रवाशांच्या सामानासोबत काय करतात

यांसारख्या उपकरणावर खर्च करण्याएवढी आर्थिक बाजू त्यांची जमेची असते पण भारतातील गरीब शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं नसतं. तेव्हा एका शेतकऱ्याने असं काही डोक लढवलं की ते पाहून विकसित देशातले शेतकरीही त्याच्या डोकॅलिटीचं कौतुक करतील हे नक्की. या शेतकऱ्याने प्लॅस्टिकच्या एका खुर्चीच्या पुढच्या भागापासून खालपर्यंत पाच पट्ट्या लावल्या आहेत. साधारण दोन फूट लांबीच्या या पट्ट्या अंतर राखून बसवण्यात आल्या आहेत. लिंबांची आकारमानाप्रमाणे विभागणी करण्यासाठी लिंबू या पट्यांवरून सोडले जातात. यापैकी आकाराने लहान असणारे लिंबू पट्यांच्या मधल्या भागातून खालच्या भांड्यात पडतात तर मोठे लिंबू पट्ट्यांवरून घरंगळत जाऊन शेवटी ठेवलेल्या भांड्यात पडतात. त्यामुळे फार कमी वेळात लिंबांची विभागणी करणे शक्य होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि अनेकजण त्याच्या डोकॅलिटीचं कौतुक करत आहे.

Grading of Lemons,

Indian Farmer does it without using any machinerypic.twitter.com/Rq76kxhxzr

— Gangadhar (@apthamitra) October 13, 2017