पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी आपण वॉटर प्युरिफायर घेण्याचा विचार करतो. योग्य वॉटर प्युरिफायर्सची निवड कशाप्रकारे करावी, याबाबत मार्गदर्शन करणारा लेख.

जलप्रदूषणाची समस्या ही भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक समस्यांपकी एक आहे. अलीकडेच या विषयासंदर्भातील अव्यवस्था, वादविवाद व चच्रेने आपल्यासमोर प्रदूषित पाण्याच्या दुष्परिणामांना समोर आणले. विशेषत: भारतात पिण्याच्या पाण्याच्या क्षेत्रामधील प्रचलित समस्या म्हणजे गंभीर जलप्रदूषणाची भीती व जलाशयाची घट, तसेच जल शुद्धीकरण तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेविषयी लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव.

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

कडक ऊन व उकाडय़ापासून सुटका व दिलासा देणाऱ्या पावसाळ्याची प्रत्येक वर्षांमध्ये आतुरतेने वाट पाहिली जाते. जरी पावसाळा हा आनंद प्रदान करणारा वातावरणीय बदल असला, तरी हा अनेक संसर्गजन्य आजार पसरवतो. खरं तर ई-कोलाय सारखे विषाणू अतिसार, उलटी, अन्नविषबाधा असे आजार होण्यास कारणीभूत ठरू शकतात. पावसाळा सुरू झाला आहे. आपण पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा संसर्ग टाळण्याकरिता काही सोप्या सूचनांचे पालन करू शकतो. बाजारपेठेमध्ये विविध वॉटर प्युरिफायर्स मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत, म्हणून तुम्ही पीत असलेले पाणी सुरक्षित व आरोग्यदायी आहे, या खात्रीकरिता योग्य प्युरिफायर्सची निवड करणे आवश्यक आहे.

पाणी अधिक उकळवणे पुरेसे नाही

पाणी उकळवण्याची क्रिया जलनिर्मित विषाणूंवर प्रभावी आहे, पण क्लोरिन कन्टेन्ट व सिस्ट्सवर या क्रियेचा कोणताच परिणाम होत नाही, तसेच ही क्रिया कचरा, कार्बनी व अकार्बनी पदार्थाना दूर करीत नाही. तसेच, आजारांना कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीव प्रभावीपणे निष्क्रिय करण्यासाठी पाणी किमान २० मिनिटे उकळवणे गरजेचे असते. दुसरी बाब म्हणजे, बहुतेक लोकांना माहीत नसते, की उकळवलेले पाणी जेव्हा उघडय़ा जागेमध्ये थंड करण्याकरिता ठेवले जाते, तेव्हा ते पाणी काही विषाणूंसह पुन्हा प्रदूषित होण्याचा धोका असतो.

सर्वासाठी एकच असे तंत्रज्ञान नसते

विविध संशोधन व अभ्यासामधून दिसून आले आहे की, भारतातील प्रत्येक भागामधील पाण्याची स्थिती भिन्न आहे आणि असे कोणतेच तंत्रज्ञान नाही, जे प्रत्येक भागातील पाणी पूर्णपणे शुद्ध करू शकते. लोकांचा समज आहे की, असे एक तंत्रज्ञान आहे, जे पाण्याच्या सर्व समस्यांचे निराकरण करू शकते. खरे तर, भारतात १७ विविध प्रकारच्या पाणी स्थिती आहेत आणि सर्वासाठी एकच असा उपाय नाही, ज्याचा पाणी शुद्ध करण्याकरिता वापर करू शकतो. पाण्याचा दर्जा समजून घेऊन त्यानुसार प्युरिफायरची निवड करणे महत्त्वाचे असते.

आरओ (रिझव्‍‌र्ह ऑस्मोसिस) हा काही ठिकाणी आढळून येणारे  जड धातू व दूषित घटकांना दूर करतो, पण सर्व नाही. जर एखाद्याने आवश्यक नसलेल्या

भागात आरओ जल शुद्धीकरणाचा वापर केला, तर पाण्यातील मिनरल्स कमी होतात, परिणामी पाण्याचा अपव्ययसुद्धा होतो. जेव्हा अनावश्यक भागात आरओ प्युरिफायरचा वापर केला जातो, तेव्हा पिण्याच्या पाण्याच्या एका ग्लाससाठी  ७ ग्लासेस पाण्याचाअपव्यय होतो. मुंबईमध्ये यूव्ही किंवा यूएफ तंत्रज्ञानाचे वॉटर प्युरिफायर घरांमध्ये येणाऱ्या पाण्यासाठी सर्वात अनुकूल असून ते उत्तम दर्जाचे पिण्याचे पाणी देतील.

प्युरिफायर, ज्यामध्ये आवश्यक मिनरल्स व व्हिटॅमिन्स असतात

कमी-मिनरल्स असलेले पाणी किंवा पाण्यामधील आवश्यक मिनरल्सचे कमी प्रमाण किंवा अभाव असलेले पाणी पिण्यासाठी योग्य नाही आणि म्हणून अशा स्वरूपाच्या पाण्याच्या नियमित सेवनामधून शरीरास आवश्यक पोषके  पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाहीत. बाजारपेठेमध्ये उच्च दर्जाच्या व अनुकूल वॉटर सोल्यूशन्सची रेंज उपलब्ध आहे, हे सोल्यूशन्स पेटंट मिनरल कार्टजि अ‍ॅण्ड बायोट्रॉन तंत्रज्ञानासह सुसज्जित आहेत, जे पाण्यामधील कणांना खेचून एकत्र करते आणि सुरक्षित व आरोग्यदायी पाणी देते.

प्रगत तंत्रज्ञान, जे आधुनिक काळातील दूषित घटकांशी लढते- सामान्यत:  तलाव, नद्यांमधून पाण्याचा पुरवठा होतो आणि साठवून ठेवलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये टीडीएसचे कमी प्रमाण असते, तर बोअरवेल्समधून काढलेल्या पाण्यामध्ये किंवा टँकर्सद्वारे पुरवठा करण्यात आलेल्या पाण्यामध्ये टीडीएस आणि इतर घातक रसायनांचे उच्च प्रमाण असते. अशा वॉटर प्युरिफायरची निवड करा, ज्यामध्ये आधुनिक काळातील दूषित घटकांना दूर करण्याची क्षमता आहे.

शुद्धीकरण ही इतर कोणत्याही प्रक्रियेप्रमाणेच आहे. तुमच्या जवळच्या व आवडत्या व्यक्तींच्या आरोग्याच्या खात्रीकरिता योग्य जलशुद्धीकरण तंत्रज्ञानाची निवड करणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.

– डॉ. अभय कुमार (युरेका फोर्ब्स इन्स्टिटय़ूट ऑफ एन्व्हायरोन्मेण्ट)