‘लोकसत्ता- ब्लॉग बेंचर्स’ या स्पध्रेत ‘माझ्या मना बन दगड’ आणि ‘आपले भुवन आपले नाविक’ या अग्रलेखांवर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांनी मांडलेले विचार.
‘भुवन’ (NRSC) ही संपूर्ण भारतीय बनावटीची प्रणाली तिच्या प्राथमिक स्थितीत २००९ साली सुरू झाली होती, तिने २०१५ मध्ये एकदा अनेक नव्या सुविधा वाढवत कात टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता ‘नाविक’ (IRNSS) च्या निमित्ताने ‘भुवन’सुद्धा प्रकाशझोतात येत आहे हे बदलत्या भारतीय मनोवस्थांचे स्वागतार्ह लक्षण मानावयास हवे. ‘भुवन’ आणि आता नाविक दोन्ही एकमेकांना पूरक अशा व्यवस्था आहेत. ‘भुवन’ आपल्या संगणकावर काम करते तर नाविक दूर अवकाशातून ‘भुवन’ला आवश्यक माहिती आणि मदत पाठवत राहील. थोडक्यात सांगायचे झाले तर, आपण जेव्हा आपला फोन अथवा तत्सम उपकरणांवर ‘लोकेशन’ची सुविधा वापरतो तेव्हा प्रत्येक वेळी आपला फोन अमेरिकेच्या उपग्रहांशी जोडला जातो. आपण घरबसल्या बोलावलेली ३ं७्र अथवा मागवलेला पिझ्झा आपल्या कळत-नकळत आपल्याला या उपग्रह प्रणालीशी जोडत असतो. या सेवेसाठी आपण डॉलर्स मध्ये किंमतही चुकवत असतो. मात्र आता नजीकच्या भविष्यात आपल्याला याच सुविधा नाविक पुरवेल आणि आपण मोबदला रुपयांमध्ये, तोही भारत सरकारला देऊ. हा वरकरणी छोटा वाटणारा बदल भारताच्या आíथक व्यवस्थेला प्रचंडच फायदेशीर ठरू शकतो. भारताच्या आíथक परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर ‘नाविक’चे आगमन सुखावह आहेच. मात्र त्याही पुढे जाऊन आपले ‘भुवन’ आणि आपले नाविक भारतीय व्यवस्थांसाठी एक मलाचा दगड ठरेल. या नव्या प्रणालींमुळे भारतीय संरक्षण सिद्धतेला एक नवा आयाम मिळेल. संरक्षण क्षेत्रातली स्वयंसिद्धता कुठल्याही समाजाला पुढच्या वाटचालीसाठी मोठाच पाठिंबा देत असते. ‘आम्हीही हे करू शकतो’ ही भावना त्या समाजाचा स्वाभिमान वाढवते. ‘भुवन – नाविक’च्या आगमनाने निर्माण झालेलं हे चतन्य बऱ्यापकी अनुभवण्यासारखं होतं. मात्र त्याच वेळी विज्ञानाप्रति असणाऱ्या न्यूनगंडापोटी, या राष्ट्रवादाच्या उसळलेल्या लाटा कितपत टिकतील याची काळजी वाटते. ‘भुवन – नाविक’ जोडीने आपल्याला खनिज संशोधन, हवामानशास्त्र, मात्स्योद्योग, पर्यावरण संरक्षण, तंत्रज्ञान आणि सीमांच्या संरक्षणात प्रचंडच पुढे नेलं असलं तरी, शनी नावाच्या खगोलापेक्षा देवातच जास्त रस असणारा आपला समाज या नव्या वैज्ञानिक उपलब्धीवर कितपत प्रतिक्रिया देतो हे बघणे रंजक ठरेल. भारतीय समाज हे नवे तंत्रज्ञानसुद्धा आत्मसात करेल यात शंका नसली, तरी प्रश्न त्यासाठी लागणाऱ्या काळाचा आहे. आणि यातच आपण वेळोवेळी कमी पडलो याला इतिहास साक्षी आहेच. म्हणूनच विपणनाची गरज पुन्हा पुन्हा जाणवते. यातूनच, नुसता ‘नाविक’च्या येण्याने बदल होणार नसून, तो बदल घडवताना ज्या सातत्यानं तो पूर्णत्वास नेला त्याच ताकदीनं आता तो जगासमोर मांडावा लागेल. नुसता ॅढर प्रणालीला पर्याय निर्माण करून काम संपत नाही तर हा नवा पर्याय तांत्रिकदृष्टय़ा जास्त सक्षम आहे याची जाणीव निर्माण करावी लागेल. तंत्रज्ञानात नाविक त्याच्या प्रतिस्पध्र्यापेक्षा कांकणभर सरस असला तरी त्याच्या आगमनाची वर्दी जगाला द्यावी लागेल. यासाठी कसल्याही राजकीय दबावांना अथवा आíथक लालसेला झुगारून देण्याची तयारी ठेवावी लागेल. या गोष्टी फक्त सरकार अथवा प्रशासनालाच लागू होतात असे नाही तर समाजाकडूनही त्यांचा पूर्ततेची अपेक्षा आहे. आजचे जग ग्राहककेंद्री आहे. कुठल्याही राजकीय दाबवांपेक्षा जास्त परिणाम ग्राहक नावाचे दबावगट निर्माण करू शकतात. तेव्हा आपल्या समाजाने स्वदेशी ‘नाविक’चा आग्रह धरणे ही त्याच्या भविष्याची दिशा ठरवणारी पहिली पायरी असेल. मात्र फक्त स्वदेशीच्या भावनिक लेबलखाली नाविक यशस्वी होईल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. आज उत्पादनं विकताना त्यांच्या क्षमतेबरोबरच त्यांच्या आकर्षक असण्याला आणि वापरकर्त्यांला सुटसुटीत वाटण्याला प्रचंड महत्त्व आहे. आणि या दोन्ही कसोटय़ांवर ‘भुवन’मध्ये सुधारणेला भरपूर वाव आहे हे प्रामाणिकपणे मान्य करावच लागेल. कुठल्याही सरकरी गोष्टीमध्ये दिसणारा सुलभतेचा आणि सौंदर्यदृष्टीचा अभाव ‘भुवन’ वापरताना पदोपदी जाणवतो. एकीकडे क्षेत्रफळ, उंची, अंतरे मोजताना अचूकतेचा प्रत्यय देणारं ‘भुवन’ एखाद्या गोष्टीत मदत मागितली असता काही पानांचं पुस्तक समोर उघडून ठेवतं. अशा वेळी या किचकट प्रकारांमधून किती ग्राहक ‘भुवन’ टिकवून ठेवू शकेल हा प्रश्नच पडतो. तेव्हा विपणन, डिझाइन आणि इंटरफेस या तीन गोष्टींवरच ‘भुवन – नाविक’चं भवितव्य बऱ्यापकी अवलंबून आहे हे नक्की. ‘नाविक’च्या वेळी इस्रोने पुन्हा एकदा दाखवलेलं सातत्य, जिज्ञासा, चिकाटी आणि विजिगीषु वृत्ती यामुळे या योजनेशी संबंधित प्रत्येक जण अभिनंदनास आणि भारतीयांच्या आदरास प्राप्त ठरतो. कफठरर ने खरोखरच एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत. या योजनेचा ‘कारगिल’पासून आजपर्यंतचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आणि विस्मयकारक आहे. येथे हे विशेषत: लक्षात घ्यायला हवे की या संपूर्ण कार्यकाळात केंद्रात दोनदा सत्तांतरे झाली, तरीसुद्धा ही योजना बासनात गुंडाळली गेली नाही. ‘नाविक’ने दीर्घ मुदतीच्या देशहिताच्या योजनांबाबत हा प्रत्यय पुन्हा एकदा दिला. अशा योजनांबाबत आपल्याला अमेरिकेचे उदाहरण दिलेले नेहमी पाहायला मिळते. तिथे सरकार बदलले तरी अशा योजना बदलत अथवा बंद होत नाहीत, हे वारंवार सांगितले जाते. अशा वेळी ‘नाविक’चा हा प्रवास निश्चितच बदलत्या भारतीय राजकारणाचा एक चांगला पलू दाखवून जातो. आपले ‘भुवन – नाविक’च्या पूर्णत्वानंतर त्याच्या प्रसारामध्ये समाजमाध्यमांनी हिरिरीने सहभाग घेतला. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना माध्यमांच्या अफाट ताकदीची कल्पना आहेच. तेव्हा आपण सर्वानीच अशा सर्व शक्य उपायांमधून ‘भुवन – नाविक’चे दोष दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. ‘भुवन – नाविक’ला आणि पर्यायाने ‘इस्रो’ला आपल्या पािठब्याची गरज आहे. तो आपला समाज नक्की देईल. बदलत्या भारताच्या प्रगतीची दोरी अशाच ‘नाविकांच्या’ हाती आहे, या शक्तीचा पूर्ण वापरच शाश्वत विकासाकडे नेणार आहे, हे नक्की!
(एमआयटी, औरंगाबाद)