नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा)तर्फे ठक्कर इस्टेट येथे २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत ‘निमा पॉवर २०१३’ हे इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स औद्योगिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १३ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे भूमिपूजन होणार आहे.
प्रदर्शनासाठी नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उत्पादन करणाऱ्या उद्योगांकडून प्रतिसाद मिळाला असून ८५ टक्के नोंदणी झाली असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली. इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन करणाऱ्या उद्योगांना एका छताखाली आणून बाजारपेठ उपलब्ध करून देणे, नाशिकच्या उद्योगांना चालना देणे, स्थानिक उद्योगांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनाचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देणे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन बेळे, निमाचे मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष किशोर राठी आदींनी केले आहे.