शहरातील संगमेश्वर कॉलनी येथील विशाखा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रोहिणी भीम भद्रे या महिलेस किरकोळ कारणावरून शेजाऱ्याने मारहाण केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. रोहिणी भद्रे यांनी वरच्या मजल्यावरून टाकलेले पाणी या भांडणास कारणीभूत झाले. अप्पासाहेब देशमुख, सुनील देशमुख, श्वेता देशमुख व आदित्य देशमुख या चौघांनी घरात घुसून आपल्याला मारहाण केल्याची तक्रार रोहिणी भद्रे यांनी पोलीस ठाण्यात दिली.