शालान्त परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करावे, यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘यशस्वी भव’ या मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप खासदार गुरुदास कामत व दै. ‘लोकसत्ता’च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ७ डिसेंबर रोजी करण्यात आले. ‘लोकसत्ता’च्या वितरण विभागाचे मुख्य व्यवस्थापक मंगेश ठाकूर, सेंट कॅथरिन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जुलिएट दिओब्रिओ, शाळेच्या पर्यवेक्षिका कॅटरिन लेंमोस, विभाग क्रमांक ५५ च्या नगरसेविका जोत्स्ना अभय दिघे, विभाग क्रमांक ५६ चे नगरसेवक बाला आंबेरकर, शिक्षणतज्ज्ञ केतन शाह, तसेच अंधेरी परिसरातील विद्यार्थी, पालक व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या वेळी नगरसेविका जोत्स्ना दिघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर मंगेश ठाकूर यांनी या पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तर कार्यक्रमांच्या शेवटी मुख्याध्यापिका जुलिएट दिओब्रिओ यांनी आभारप्रदर्शन केले.
अंधेरी विभागात प्रगत विद्यामंदिर, टाटा कम्पाऊंड, सेंट कॅथरिन हायस्कूल (अंधेरी पश्चिम), झानसागर विद्यालय, जोगेश्वरी (प), मोतिलालनगर महापालिका शाळा, गोरेगाव (प),विद्यामंदिर गोरेगाव (प), तर मालाड पूर्वेकडील मंगेश विद्यामंदिर, नूतन विद्यामंदिर, ल. प. जगदाळे विद्यालय, विदर्भ विद्यामंदिर या दहा शाळांमध्ये या यशस्वी भव पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.