येथील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी १ लाख ४० हजार रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान यांनी केलेल्या आवाहनास विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दहा रुपये तर प्राध्यापकांनी प्रत्येकी हजार रुपये दुष्काळग्रस्तांसाठी दिले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यथाशक्ती मदत दिली. त्यातून ७० हजार रुपये निधी संकलित झाला. तेवढीच रक्कम व्यवस्थापनाने दिली. जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांच्याकडे मदत निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.