‘आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाज्या, पण आजकाल भाज्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा, विषारी कीटकनाशकांचा अमर्याद वापर केला जात आहे. अशा भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहेत. म्हणूनच आपल्या अवतीभोवती नैसर्गिकपणे वाढणाऱ्या रानभाज्या, निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील,’ असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांनी केले. निसर्गमित्र संस्थेच्या वतीने ‘ओळख रानभाज्यांची’ या पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश शिपूरकर होते. या वेळी प्रमुख उपस्थिती सत्यजित गुजर होते. डॉ. बाचुळकर म्हणाले, या पुस्तकात सुमारे ५४ रानभाज्यांची माहिती, त्यांची स्थानिक व शास्त्रीय भाषेतील नावे, त्यांचे औषधी गुणधर्म, आहारातील महत्त्व याची माहिती देण्यात आली आहे. गुजर म्हणाले, आपल्या सभोवताली समृद्ध वनस्पती संपदा आहे. शेतात, ओसाड पडीक जमिनीवर, बागेत, परसात, जंगलात अनेक वनस्पती आहेत. डॉ. अशोक वाली, डॉ. हरीश नांगरे, अनिल चौगले, निहाल शिपूरकर, खंडेराव भोसले, अजित अकोळकर, अवधूत वीर, उमाकांत चव्हाण, संदीप चव्हाण-बंदरे, ओंकार मोहिते उपस्थित होते. अनिल चौगुले यांनी प्रास्ताविक केले. श्यामराव कांबळे यांनी आभार मानले.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…