* मी बँकेत काम करतो. मला फिरायची खूप हौस आहे. मला त्यासाठीच गाडी घ्यायची आहे. मात्र हॅचबॅक सेगमेंटमध्ये नेमकी कोणती गाडी घ्यावी याबद्दल संभ्रम आहे. मला चांगला मायलेज देणारी, कमी मेन्टेनन्स असणारी आणि स्टायलिश आरामदायी असे फीचर्स असणारी गाडी हवी आहे. तुम्ही काही सुचवा. माझे बजेट साडेसहा लाख रुपये आहे.

राहुल काळमेघ.

* चांगला मायलेज आणि कमी मेन्टेनन्स याबाबतीत सद्य:स्थितीत स्विफ्ट आणि बलेनो या दोन गाडय़ा चांगल्या आहेत. मात्र नवी फोर्ड फिगोही या सेगमेंटमध्ये एक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. या तीनपकी एका गाडीचा तुम्ही विचार करावा.

* नमस्कार. प्रथमच कार घेतेय. पुण्यात ऑफिसला रोज साधारण येणेजाणे एकूण २५ कि.मी. आणि महिन्यातून एकदा गावी येणेजाणे एकूण ५०० कि.मी. असा वापर असेल. कुटुंब आई (वय ६०) मी (वय ४०) असे आहे. आम्हाला गाडीतील काहीच समजत नाही. त्यामुळे कमी देखभाल, अपघात सुरक्षितता, चांगली íव्हसिंग सेवा आणि महत्त्वाचे पाठीला खूप कम्फर्ट असणारी आरामदायी (सध्या दुचाकीमुळे पाठीचा खूप त्रास आहे.) गाडी हवी. सलग आठदहा दिवस ती बंद राहिली तरी अडचण येऊ नये. बजेट, ब्रँडची अट नाही.

दिव्या िशदे, पुणे

* तुम्ही अगदी डोळे मिटून मारुती वॅगन आर एएमटी (ऑटो गीअर) ही गाडी घ्यावी. ही गाडी ट्रॅफिकमध्येही उत्तम चालते आणि गीअरलेस असल्याने पायांनाही त्रास होत नाही. जास्त वयाच्या लोकांना ही गाडी बसण्यासाठी उत्तम आहे.

* सर माझे बजेट . ते .२० लाखपर्यंत आहे. फोर्ड फिगो पेट्रोल आणि मारुती सलेरिओ या दोन्हीमध्ये कोणती चॉइस करावी? माझे मासिक ड्रायिव्हग २०० ते ४०० किमी आहे. कधी तरी मी लाँग ड्राइव्हला जातो. ग्रामीण भागात यापकी कोणती गाडी चांगली?

पवन कुलकर्णी, परभणी

* फोर्डचे सíव्हस सेंटर जवळ असेल तर नक्कीच फिगो घ्यावी. ही गाडी मारुतीपेक्षा दणकट आहे आणि तिचा मायलेजही उत्तम आहे.

या सदरासाठी प्रश्न पाठवाls.driveit@gmail.com