काही ब्रँड असे असतात की नुसत्या नामोल्लेखामुळे त्यांच्याविषयी मनात आदराची भावना आपसूक निर्माण होते. त्या ब्रँडचा स्वतचा एक असा आब आणि रुबाब असतो. चारचाकींमध्ये मर्सडिीज, बीएमडब्ल्यू, ऑडी इत्यादींना हा बहुमान मिळाला आहे. या एकेका ब्रँडचा इतिहास थोर आहे. आणि त्याहून त्यांची कामगिरीही. म्हणूनच तुमच्याकडे या ब्रँडपकी कोणतीही गाडी असो तुमचा रुबाब वाढतोच. ऑडी क्यू३ही त्याला अपवाद नाही..

ऑडी या जर्मन ब्रँडची कोणतीही गाडी तुमच्याकडे असली तरी तुमच्या रुबाबात भर पडतेच. कारण एकमेकांत अडकवलेल्या चार बांगडय़ा हे बोधचिन्ह सर्वाना आकर्षति करणारे आहे. ऑडीच्या क्यू३ या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला रुबाबदार हे विशेषण त्यामुळेच अगदी समर्पक आहे. बाहेरून दिमाखदार, रुबाबदार दिसणारी ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आतूनही अगदी तश्शीच आहे. तुमच्या पोटातलं पाणीही हलणार नाही, एवढा आरामदायी आनंद देते ही गाडी. पाच जणांसाठी उत्तम असलेल्या या गाडीची वैशिष्टय़े म्हणजे हिचा मायलेज उत्तम आहे शिवाय हिच्यातील सेफ्टी फीचर्सही ‘स्टेट ऑफ द आर्ट’ आहेत. शिवाय गाडीचा वेग भन्नाट आहे. लाँग ड्राइव्हला जाण्यासाठी अगदी यथायोग्य अशीच आहे क्यू३, क्वात्रो व्हेरिएंट.

अंतरंग

क्यू३मध्ये प्रवेश करताच हिच्यातील आरामदायीपणा तुम्हाला जाणवू लागतो. मागच्या सीटवर किमान तीन जण बसू शकतील अशी व्यवस्था आहे. मागील आसन आणि चालक व चालकाशेजारील आसन यांच्यातील अंतर बऱ्यापकी असल्याने मागे बसणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास जाणवत नाही. म्हणजे पुढील आसने पायांना लागत नाहीत. शिवाय मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी एसी ब्लोअर देण्यात आला आहे. त्यामुळे मागे बसणाऱ्यांना आल्हाददायक हवा मिळू शकते. बाहेरील तापमानानुसार गाडीतील तापमान नियंत्रित करण्याची व्यवस्था वातानुकूलन यंत्रणेत आहे. याशिवाय कपहोल्डर्स, आर्मरेस्ट या सुविधाही आहेत.डॅशबोर्डवर एक मोठा इन्फोटेन्मेंट स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर तुम्हाला गाडीतील सर्व गॅजेट्सची माहिती, मॅप वगरे दिसू शकतात. शिवाय पाìकगच्या वेळीही या स्क्रीनची मदत होते. चालकाच्या आसनाला त्याच्या शरीरआकारानुसार आसन मागे-पुढे वा उंचीनुसार वर-खाली करता येण्याची सोय आहे. स्टीअिरगलाही ही सोय आहे. तुम्हाला सोयीस्कर ठरू शकेल, अशा प्रकारे स्टीअिरग अ‍ॅडजस्ट करता येऊ शकते. गाडीतील इन्फोटेन्मेंटचे कंट्रोल पॅनेल स्टीअिरगवरही असल्याने चालक तेथूनही त्याचे ऑपरेटिंग करू शकतो. याशिवाय गाडीला सनरूफ आहे. त्यामुळे महामार्गावर सनरूफ उघडून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. विशेषत लहान मुलांसाठी सनरूफ उघडून त्यातून मान बाहेर काढून पाहणे हा आनंदसोहळा असतो. चालकाच्या बाजूला बसणाऱ्याला आराम वाटावा यासाठी लेग रूम चांगल्या प्रमाणात देण्यात आली आहे. त्याशिवाय पॉवर िवडो आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल या सुविधाही गाडीत आहेत. तसेच गाडीच्या इंधन टाकीत किती इंधन शिल्लक आहे आणि त्यानुसार तुम्ही पुढे किती अंतर कापू शकता, हे दर्शवणारी यंत्रणाही क्यू३ मध्ये आहे.

त्यामुळे निर्धोक होऊन चालक गाडी चालवू शकतो.

बाह्य़रूप

पहिली गोष्ट नजरेत भरते ती म्हणजे क्यू३चा ग्राउंड क्लिअरन्स. घसघशीत १७० मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स क्यू३ला असल्याने गाडी उंच भासते. समोरून बघितल्यानंतर ऑडीचे बोधचिन्ह लक्ष वेधते. त्यानंतर आकर्षक हेडलॅम्प्स आपले लक्ष वेधतात. अर्धोन्मिलित भासणारे हे हेडलॅम्प्स गाडीच्या सौंदर्यात भर घालतात. हेडलॅम्प्समधील लाइट एलईडी आहेत. डेटाइम रिनग लाइट (डीआरएल) सिस्टमही दिव्यांना आहे. त्यामुळे पावसाळी वातावरणात दिवसाढवळ्या ढग दाटून आल्यास गाडीचे हेडलॅम्प्स लगेचच कार्यान्वित होतात. साइड मिर्स, टेललॅम्प्स यांच्याही बाबतीत ऑडीने हातचे राखून ठेवलेले नाही. क्यू३च्या मागच्या बाजूला रिअर व्ह्य़ू कॅमेरा असल्याने पाìकगच्या वेळी अडचण येत नाही. बूट स्पेसही प्रशस्त आहे. त्यामुळे पिकनिकला वा लांबच्या प्रवासाला जायचे असल्यास मोठय़ा प्रमाणात सामान मागच्या बाजूला बसू शकते. त्यामुळे क्यू३ घेऊन प्रवासाला जाताना सामानाची चिंता बाळगण्याची गरज नाही. गाडीचे टायर्स ही आणखी एक खास बाब. क्यू५ पेक्षा क्यू३ दहा इंचांनी कमी उंच आहे. मात्र, असे असले तरी दणकट टायर्समुळे क्यू३ रस्त्यावरून सुसाट वेगाने पळते. टायरची ग्रिप कुठेही कमी होताना आढळत नाही. मागच्या काचेवर वायपरची सोय असल्याने पाऊस वा धुक्यातही मागून येणाऱ्या गाडय़ा चालकाला गाडीतील आरशात स्पष्ट दिसू शकतात.

सुरक्षिततेला प्राधान्य

सुरक्षेच्या दृष्टीने ऑडीच्या सर्वच गाडय़ा सर्वोत्तम आहेत. पुढे दोन एअरबॅग्ज आणि मागील बाजूला दोन अशा चार एअरबॅग्ज क्यू३ मध्ये देण्यात आल्या आहेत. सीटबेल्ट लावण्याची सक्ती आहे. न लावल्यास तसा इशारा देणारी यंत्रणा आहेच. याशिवाय फ्रंट आणि साइड इम्पॅक्ट बीम्स, क्रॅश सेन्सर्स, अँटी थेफ्ट डिव्हाइस अशा अनेक फीचर्समुळे ही गाडी अधिक सुरक्षित होते.

इंजिन

डिझेलवर चालणाऱ्या क्यू३चे इंजिन दमदार आहे. डिझेलचे असले तरी या इंजिनाचा आवाज येत नाही. तसेच शून्य ते १०० किमी प्रतितास एवढा प्रचंड वेग अवघ्या काही सेकंदांत घेण्याची ताकद देणारे हे इंजिन आहे. गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर असून सात स्पीड गीअर्स आहेत. मॅन्युअल मोडवर हवी असेल गाडी तर गीअर्स तसेही शिफ्ट करता येतात, मात्र त्यासाठी सरावाची गरज आहे.

क्यू३चा ड्रायिव्हग अनुभव

तुफान पाऊस, मध्येच दाट धुके आणि स्वच्छ ऊन अशा वातावरणात मुंबई-नाशिक हायवेवर क्यू३ चालविण्याचा अनुभव घेता आला. गाडीचा वेग प्रचंड आहे. शिवाय अगदी कमी वेळात गाडी वेग पकडते. मात्र, तेवढय़ात ती नियंत्रितही होऊ शकते. गाडी वेगात असली तरी रस्ता सोडत नाही, हे आणखी एक वैशिष्टय़.

क्वात्रो आणि फोर व्हील ड्राइव्ह अशा दोन्ही प्रकारांत क्यू३ उपलब्ध आहे.

किंमत

३७ लाखांपासून पुढे

ls.driveit@gmail.com