• सर, माझे बजेट तीन ते सहा लाख रुपये आहे. मला चार आसनी गाडी हवी आहे. शिवाय तिचा मायलेजही चांगला असायला हवा आणि कम्फर्टच्या दृष्टीनेही गाडी चांगली असावी. माझे दरमहा किमान ९० ते १०० किमीचे रिनग होते. कार सुचवा.

           – अभिषेक राठोड

  • तुमचे मासिक ड्रायिव्हग खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सेलेरिओ किंवा मग वॅगन आर यांपकी एखादी गाडी परवडू शकते. या दोन्ही गाडय़ांचा मेन्टेनन्स खूपच कमी आहे आणि त्यांचा मायलेजही खूप चांगला आहे.
  • मी शिक्षक असून माझे रोजचे १५० किमी जाणे-येणे आहे. तेव्हा मला कामाच्या ठिकाणी तसेच शेतातपण वापर होईल अशी गाडी सुचवा. आपण बऱ्यांच लोकांना फोर्ड फिगो घेण्यास सांगता त्याचे कारण काय? मला दोन गाडय़ा आवडतात- स्विफ्ट आणि फिगो. कोणती योग्य? कृपया मार्गदर्शन करावे.

          – संदीप कन्होर, मालेगाव

mysterious human like shiny objects floating viral video
एलियन की UFO, हे नक्की काय आहे? आकाशात चमकणारी ‘ही’ गोष्ट नेमकी कोणती? Video पाहून व्हाल चकित
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या
watch jugaad viral video
बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
  • तुम्हाला शेताच्या ठिकाणी किंवा त्या परिसरात चालवण्यासाठी गाडी हवी असेल तर मिहद्राची टीयूव्ही ३०० ही उत्तम गाडी आहे; परंतु तुम्हाला कार घ्यायची असेल तर टाटा बोल्ट ही डिझेलवर चालणारी गाडी घ्यावी. या गाडीचे मायलेज २३ किमी प्रतिलिटर एवढे आहे. तसेच मेन्टेनन्सही कमी आहे.
  • मी फक्त सुट्टीच्या दिवशी गाडी चालवणार आहे. दर आठवडय़ाला किमान २०० किमीपर्यंत गाडी चालवायची आहे. सध्या माझ्याकडे वॅगन आर आहे; परंतु मला आता चांगला बदल हवा आहे. मी इटिऑस लिवा आणि इटिऑस क्रॉस या गाडय़ांचे फीचर्स पाहिले आहेत. यांपकी कोणती गाडी चांगली आहे किंवा मी ऑटोगीअर गाडी वापरावी का? माझे वय आता ५९ आहे.

           – दीपक ठुसे

  • मी तुम्हाला मारुतीची बलेनो ही ऑटोगीअर गाडी घेण्यास सुचवेन. ही गाडी सात लाख ३० हजार रुपयांपर्यंत ऑन रोड मिळू शकेल. ही गाडी तुमच्यासाठी चांगली आहे. मेन्टेनन्स कमी आणि चांगला मायलेज ही या गाडीची वैशिष्टे आहेत.
  •  सध्या माझ्याकडे वॅगन आर ही गाडी आहे. गेली सहा वष्रे ही गाडी मी वापरत आहे. आता मला नवीन सहा-सात आसनी गाडी घ्यायची आहे माझ्या कुटुंबीयांसाठी. माझे महिन्यातून किमान १०० किमी फिरणे होते. आणि दोन-तीन महिन्यांत एकदा लाँग टूर होते. मला नवीन गाडी सुचवा कोणत्याही व्हेरिएंटमधली.

 -शर्वलि खडतरे

  • सर्वात स्वस्त अशी आठआसनी गाडी म्हणजे शेवरोले एन्जॉय. तुमचे मासिक ड्रायिव्हग कमी असल्याने तुम्ही पेट्रोल व्हर्जनमधली गाडी घ्या. हीच गाडी तुमच्यासाठी योग्य ठरू शकेल.
  • सर मला ५ वर्षे जुनी अल्टो के१० गाडी १.७० लाखांत मिळत आहे. माझे महिन्याचे रिनग ५०० किमी असेल. गाडी ७०००० किमी चाललेली आहे. कृपया मला सांगा मी ही गाडी घेऊ का?

         – डॉ. प्रदीप भारंबे, अकोला</strong>

’ ७० हजार किमी चाललेली अल्टो के१० म्हणजे जरा जास्तच आहे. तिची कंडिशन बघूनच निर्णय घ्या; परंतु शक्यतो ३०-४० हजार किमी चाललेली गाडी घेणे योग्य ठरेल.

  • मला टाटा सफारी स्टॉर्म एक्स हे मॉडेल घ्यायचे आहे. मला योग्य मार्गदर्शन करा. सेकंड हँडचा पर्याय कसा राहील.

            – पद्माकर जगताप

  • सफारी स्टॉर्म ही सर्वात दणकट आणि उत्तम गाडी असून रफ रोड्स आणि हायवेला ती उत्तम चालते; परंतु या गाडीचे स्टीअिरग आणि क्लच यांच्यात स्मूदनेस नाही. त्यामुळे गाडी चालवायला जड वाटते. मी तुम्हाला टीयूव्ही ३०० किंवा एक्सयूव्ही ५०० यांपकी एकाची निवड करण्यास सांगेन. सेकंड हँड झायलोही मिळू शकेल.
  • होंडाच्या गाडय़ा चांगल्या आहेत काय? मला मित्रांनी सांगितले की, होंडाची सíव्हस चांगली नाही. मला अमेझ आणि मोबिलिओ खूप आवडतात. पण द्विधा मन:स्थितीत आहे.

           – किशोर पोळ

  • होंडाच्या अमेझ आणि मोबिलिओ या इंजिन आणि क्वालिटी या दोन्ही प्रकारांत उत्तम आहे. पण वजनाने थोडय़ा हलक्या असल्यामुळे पाच जण बसल्यावर त्या थोडय़ा खाली बसतात आणि टायर खड्डय़ांमध्ये गेल्यावर गार्डला थडकते. या दोन्हींच्या तुलनेत मारुती, शेवरोले, स्कोडा आणि टोयोटा या गाडय़ा उत्तम आहेत. पण होंडाच्या गाडय़ा वेल रिफाइन्ड असल्याने लोडसाठी बनवलेल्या नाहीत. एक किंवा तीन जणांसाठी या गाडय़ा उत्तम आहेत. मोबिलिओ ही प्रशस्त गाडी आहे पण उंचीने कमी असल्यामुळे तिसऱ्या सीटवर आरामशीर नाही वाटत. लेग रूम आणि हेड रूम कमी वाटतो.
  • आगामी वर्षांत मला कार घ्यायची आहे. मला काहीही माहिती नाही कारविषयी. कोणती कार घेणे आíथकदृष्टय़ा परवडेल.

       – रमेश सावंत

  •  विचार करीत असाल तर मारुती अल्टो के१० घेणे जास्त सयुक्तिक ठरेल. कारण या गाडय़ा टिकाऊ आहेत आणि त्यांची रिसेल व्हॅल्यूही चांगली आहे. तुम्हाला विकावीशी वाटली तरी तुम्हाला ते सहज शक्य होते.
  • तुमचा कॉलम मी रेग्युलर वाचते. मला गाडय़ांविषयी खूप आवड आहे. मात्र, कोणती घ्यावी, कशी घ्यावी, कोणती चांगली आहे, याविषयी काहीच माहिती नाही.

           – तृप्ती शिंदे

  • धन्यवाद. गाडी घेताना नेहमी आपले बजेट, तिचा सुयोग्य वापर, किंमत, तिला बाजारात असलेली रिसेल व्हॅल्यू, तिचा मेन्टेनन्स, मायलेज, सíव्हस सेंटर्स यांचा प्राधान्याने विचार करावा. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार गाडीप्रकार ठरवता येतो. म्हणजे तुमच्या कुटुंबाचा आकार चौकोनी असेल तर सेडान, हॅचबॅक या गाडय़ा चांगल्या असतात. मात्र, तुमच्या कुटुंबात सदस्यसंख्या जास्त असेल तर तुम्ही एसयूव्ही, एमयूव्हीचा विचार करावा. तुम्ही नवशिक्या असाल तर नक्कीच वॅगन आर ही गाडी घ्यावी, कारण तिची सीट हाइट उंच आहे, शिवाय समोरचेही स्पष्ट दिसते व गाडीची लांबी कमी असल्यामुळे टìनग रेडिअसही कमी आहे व चालवायलाही सोपी आहे.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com