क्रूझर मोटरसायकल म्हटले की लांब वाढविलेल्या मिशा, हॅट, हाफ जॅकेट, गुढघ्याच्या खालपर्यंत घातलेले लेदर बूट्, असा काऊबॉय शैलीतील ्रढम..्रढम.. असा आवाज करीत फिरणारी व्यक्ती आणि मोटरसायकल डोळ्यापुढे उभी राहते. खरे तर या मोटरसायकलचा जन्म अमेरिकेत १९३० च्या आसपास झाला. भारतीयांना प्रत्यक्ष बाजारपेठेत १९९८-९९ मध्येच पाहायला मिळाली. अजूनही अशा मोटरसायकलचे बहुतेक प्रत्येक मोटरसायकलप्रेमींना अप्रूप आहेच आणि अशी मोटरसायकल आयुष्यात एकदा तरी घेण्याची इच्छाही.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी, ताकदवान इंजिन, वजनदार आणि आकर्षक अशी ही मोटसायकल नेहमीच्या मोटरसायकलच्या तुलनेत उंचीला कमी असली तरी लांबीला मोठी असते. जागतिक पातळीवर सुरुवातीस हाल्रे डेव्हिडसन, इंडियन, एक्सेलिसर, हेंडरसन या कंपन्यांकडून १९६० पर्यंत क्रूझर मोटरसायकलचे उत्पादन प्रामुख्याने होत होते. मोटरसायकल चालविणाऱ्याबरोबर मागील प्रवाशास लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आराम मिळण्यासाठी चालविण्याची सीट बसकी असते आणि मागे बसणाऱ्याच्या पाठीला आराम मिळण्यासाठी सपोर्ट असोत. ब्रेक आणि गीअर शिफ्टर पुढील बाजूस पसरल्यासारखे असतात आणि हँडल वर असते. जागतिक पातळीवर बहुतेक हायएंड क्रूझर मोटरसायकलना ट्विन सििलडर इंजिन असते. मात्र, आता सिंगल सििलडरच्या मोटरसायकलचे उत्पादन होते.

क्रूझर मोटरसायकलचे इंजिन जागतिक पातळीवर सरासरी पाचशे सीसीपासून उपलब्ध आहेत. बाजारपेठेची मागणी लक्षात घेता २५० सीसीच्या पर्यायातदेखील (भारत अपवाद) उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार क्रूझर मोटरसायकलची बांधणी, रचना, रंगसंगती करून देण्याची पद्धत जागतिक पातळीवर आहे. त्यामुळेच या मोटरसायकल जास्त लोकप्रिय आहेत. भारतातही कस्टमाइज मोटरसायकल करून देण्याची सुविधा आहे. मात्र, मोटसायकलमध्ये असे बदल करून घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.  भारतातील पहिली क्रूझर मोटरसायकल बजाज ऑटोने २१ व्या शतकाच्या सुरुवातीस बजाज-कावासाकी एलिमिनेटर म्हणून लाँच केली. या मोटरसायकलला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने एलिमिनेटर बंद करून २००५ मध्ये त्याचेच भारतीय स्वरूप अ‍ॅव्हेंजर लाँच केले. या मोटरसायकलला पल्सर मोटरसायकलचे १८० सीसीचे इंजिन बसविण्यात आले होते. त्यानंतर २००७ मध्ये या मोटरसायकलला २०० सीसीचे ऑइल कूल्ड इंजिन बसवून नवे मॉडेल लाँच केले गेले. मात्र, याही मोटरसायकलला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच २०१० मध्ये २२० सीसी क्षमतेचे इंजिन असणारी, िवडशिल्ड फेंडर असणारी अ‍ॅव्हेंजर बाजारात आणली. मात्र, तरीही कंपनीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीने पुन्हा एकदा या सेगमेंटमध्ये नशीब अजमावण्याचे निश्चित केले आणि अ‍ॅव्हेंजरची तीन नवी मॉडेल सुधारित इंजिनसह बाजारात आणली. यात देशातील सर्वात कमी सीसी म्हणजे १५० सीसी इंजिन असणाऱ्या मॉडेलचाही समावेश आहे. जागतिक पातळीवर यामाहा, सुझुकी, बीएमडब्लू, ट्रायम्फ, यूएम मोटरसायकल्स, रॉयल एन्फिल्ड आदी कंपन्या हाय एंड क्रूझर मोटरसायकलचे उत्पादन करतात. यातील यूएम मोटरसायकल, यामाहा, हाल्रे डेव्हिडसन, सुझुकी यांच्या क्रूझर मोटरसायकल भारतात उपलब्ध आहेत. मात्र, यांचे उत्पादन येथे होत नाही. काही मॉडेल्सची जुळणी () केली जाते. यूएम मोटरसायकल या अमेरिकेतील कंपनीने भारतात दोन क्रूझर मोटरसायकल्स भारतात सादर केल्या आहेत.

ls.driveit@gmail.com