मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला ‘रुदाली’ची उपमा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका करताना म्हटलं की, मूळ भाजपा मेला आहे आणि त्याचा खून या लोकांनी केला आहे. फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, मराठी माणसाचे आनंदाचे क्षण ज्यांना रुदाली वाटतात, ती विकृत वृत्तीची माणसं आहेत.