scorecardresearch

ऐश्वर्या राय बच्चन Photos

ऐश्वर्या राय-बच्चन ही भारतीय अभिनेत्री, मॉडेल आहे. तिचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही वर्षांनी राय कुटुंब मुंबईला वास्तव्याला आले. ऐश्वर्याने मुंबईतील आर्य विद्या मंदिर या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिला विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते. पण मॉडेलिंगबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने ऐश्वर्या या क्षेत्राकडे वळली. या क्षेत्रामध्ये काम करता-करता ती अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. १९९३ मध्ये पेप्सीच्या जाहिरातीमध्ये ती झळकली. या जाहिरातीमुळे ऐश्वर्याला खूप लोकप्रियता मिळाली. १९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा खिताब मिळवला. या काळात तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. १९९७ मध्ये मणी रत्नम यांच्या ‘इरुवर’ (Iruvar) या चित्रपटामधून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी तिचा ‘और प्यार हो गया’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सुपरहिट झाला. ऐश्वर्याने ‘ताल’, ‘देवदास’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरु’, ‘जोधा अकबर’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या काळात सलमान खान, विवेक ओबेरॉय यांसारख्या अभिनेत्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले. सलमान आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ पासून डेट करत होते असे म्हटले जाते. काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे. आराध्या बच्चनचा जन्म २०११ मध्ये झाला. लग्नानंतर ऐश्वर्याने काही वर्ष ब्रेक घेतला होता. मणी रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (PS 1) या चित्रपटांच्या माध्यमातून तिने कमबॅक केले आहे. Read More
top 10 richest actresses of bollywood
18 Photos
Photo : ऐश्वर्या ते दीपिका, बॉलीवूडच्या ‘या’१० अभिनेत्री कोट्यवधीच्या मालकीण; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कमाईच्या बाबतीत अभिनेत्यांनाही मागे टाकतात. कोण आहेत त्या अभिनेत्री? जाणून घ्या…

Aradhya Bacchan (1)
9 Photos
PHOTOS : आराध्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी पोहोचले शाळेत; अमिताभ बच्चनसह ‘या’ दिग्गजांची हजेरी!

मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बी टाऊनमधील अनेक कलाकार उपस्थित होते.

Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan
9 Photos
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या राय अन् अभिषेक बच्चन दिसले एकत्र; आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमाला लावली हजेरी

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेकीच्या हजेरी, ऐश्वर्याने सासरचं घर सोडल्याच्या चर्चांदरम्यान फोटोंनी वेधलं लक्ष

bachchan family
9 Photos
अगस्त्य सर्वाधिक हसवतो, तर ऐश्वर्या राय कधीच…; अभिषेक व श्वेताने सांगितलेले बच्चन कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपचे सिक्रेट

बच्चन फॅमिलीच्या व्हॉट्सअॅप ग्रूपचे सिक्रेट काय? जाणून घ्या

Aishwarya Rai Bachchan never replies on time, know secrets of Bachchan family WhatsApp group
9 Photos
“ऐश्वर्या कधीच वेळेवर…”, अमिताभ यांच्या लेकीने सांगितलेलं बच्चन कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचं गुपित

“जया बच्चन…”, कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपबद्दल अमिताभ यांच्या लेकीने केलेला खुलासा

Aishwarya Rai Birthday | Aishwarya Rai Bachchan Aishwarya Rai first commercial
8 Photos
ऐश्वर्या राय नववीत शिकत असताना चित्रपटात नव्हे तर ‘या’ टीव्ही जाहिरातीत पहिल्यांदाच दिसली!

Aishwarya Rai Birthday: ऐश्वर्या राय बच्चनने मॉडेलिंगपासून ते चित्रपटांपर्यंत सर्वच क्षेत्रात यश मिळवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की,…

Aaradhya Bachchans whopping school fees
12 Photos
अभिषेक व ऐश्वर्या आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी मोजतात मोठी किंमत, आकडा पाहून व्हाल थक्क

Aaradhya Bachchan’s whopping school fees: सर्वात महागड्या शाळेत शिकतेय अभिषेक बच्चन अन् ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्या. शाळेची फी थक्क…

sneha-ullal-aishwarya-rai
9 Photos
ऐश्वर्या रायची डुप्लिकेट म्हणून ओळखली जाणारी स्नेहा उल्लाल कुठे आहे? ‘या’ कारणासाठी घेतलेला अभिनेत्रीने ब्रेक

तिचे लूक्स, खासकरून तिचे डोळे हे अगदी ऐश्वर्यासारखे असल्याने बऱ्याच लोकांचा गोंधळ उडत असे

bollywood actress cate fight
13 Photos
कुणी अभिनेत्यांसाठी, तर कुणी चित्रपटांसाठी भांडलं; बोलणंच काय तर एकमेकींचं तोंडही बघत नाहीत ‘या’ अभिनेत्री

बॉलिवूडमधील टॉपच्या अशा अभिनेत्री ज्या एकेकाळी चांगल्या मैत्रिणी होत्या मात्र, आता त्यांच्या ३६चा आकडा आहे

Abhishek Bachchan aishwarya feature
30 Photos
“मला बेडरुमबाहेर झोपावं लागलं होतं, कारण ऐश्वर्या…” अभिषेक बच्चनने सांगितलेला ‘तो’ किस्सा

“मला बेडरुमबाहेर झोपावं लागलं होतं, कारण ऐश्वर्या…” अभिषेक बच्चनने सांगितलेला ‘तो’ किस्सा

ताज्या बातम्या