ऐश्वर्या राय बच्चनच्या वाढदिवसानंतर तिच्या व अभिषेकच्या विभक्त होण्याच्या खूप चर्चा होत्या. ऐश्वर्याने बच्चन कुटुंबाचं घर सोडलंय, ती दुसरीकडे राहते, अशाही बातम्या येत होत्या. दोघेही लवकरच घटस्फोट घेतील, असंही म्हटलं गेलं. अभिषेक व ऐश्वर्या यांनी मात्र याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं, पण बऱ्याचदा ते कुटुंबाबरोबर कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. या त्रिकोणी कुटुंबाचा एक व्हिडीओ चर्चेत आहे.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील ऐश्वर्या, अभिषेक व आराध्या यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते तिघेही प्री-वेडिंगमधील परफॉर्मन्सचा आनंद घेताना दिसत आहेत. व्हिडीओत ते तिघेही एकत्र बसल्याचं दिसतंय. ऐश्वर्या व आराध्या टाळ्या वाजवून कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत, तर अभिषेकही नंतर त्यांच्यामध्ये सामील होतो.

Video: हम साथ साथ है! बच्चन कुटुंबाच्या तीन पिढ्यांची एकत्र अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला हजेरी, जया बच्चन मात्र…

या व्हिडीओत आराध्याची हेअरस्टाइल बदलल्याचं दिसतंय, ते पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अखेर आराध्याची हेअरस्टाइल बदलली, अखेर इतक्या वर्षांनी आराध्याचं कपाळ दिसलं, अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत. तर अभिषेकचं कुटुंब खूप चांगलं आहे, आराध्या व ऐश्वर्या सुंदर दिसत आहेत, अशा कमेंट्सही या फोटो व व्हिडीओंवर आहेत.

aaradhya
आराध्याच्या व्हिडीओवरील कमेंट्स
aaradhya
आराध्याच्या व्हिडीओवरील कमेंट्स

भर कार्यक्रमात रिहानाचा ड्रेस उसवला, नीता अंबानींबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल

दरम्यान, अनंत अंबानींचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्ये धूमधडाक्यात पार पडला. या भव्य सोहळ्यात जगभरातून एक हजारहून अधिक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. बॉलीवूड सेलिब्रिटींसह जगभरातील प्रतिष्ठित पाहुण्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. रविवारी या प्री-वेडिंग सोहळ्याचा समारोप झाला.

Story img Loader