scorecardresearch

आर्यन खान Photos

शाहरुख खानचा (Sharukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मागच्या वर्षांपासून प्रकाशझोतामध्ये आहे. त्याचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. मुंबईमधील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनला गेला. २०१६ मध्ये त्याने सेव्हनॉक्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून पदवी मिळवली. पुढे तो मायदेशी परतला. २००१ मध्ये त्याने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटामध्ये काही सेकंदांसाठी तो झळकला होता. <br />
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ या चित्रपटामधील ‘सिम्बा’ या प्रमुख पात्राला त्याने आवाज दिला. करोना काळामध्ये आर्यन खान खूप चर्चेत होता. एका क्रूझवर मित्रासह पार्टी करत असताना अमली पदार्थ विरोधी पथकाने त्या क्रूझवर छापा मारला. तेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तेथे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडले होते. या प्रकरणी आर्यनसह क्रूझवर उपस्थित असणाऱ्यांवर खटले भरवण्यात आले. काही महिन्यांसाठी त्याला तुरंगवासाची शिक्षा भोगावी लागली. मार्च २०२२ मध्ये पुराव्यांअभावी आर्यनची सुटका करण्यात आली.

तो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आर्यन लेखक म्हणून शाहरुखच्या निर्मिती संस्थेमध्ये काम करत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने स्वत:चा व्होडका ब्रँड बाजारात आणणार आहे.
Read More
aryan khan shared photo with suhana khan and abram
15 Photos
Photo : ड्रग्ज प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खानने पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, नेटकरी म्हणाले “तू तर शाहरुख…”

ड्रग्ज प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खानने पहिल्यांदाच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तब्बल एक वर्षांनंतर पोस्ट शेअर केली आहे.

NCB gave clean cheat to aryan khan
12 Photos
Photos: आर्यन खानला NCB कडून दिलासा मिळताच शाहरुखच्या मन्नतबाहेर चाहत्यांची गर्दी

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट दिली आहे.

IPL 2022 Auction Who is KKR player Ramesh Kumar who known as superstar in tennis ball cricket
15 Photos
Photos: ‘टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार’ अगदी शेवटच्या क्षणी आर्यन, सुहानामुळे KKR च्या संघात; पण तो आहे तरी कोण?

कोलकात्याच्या संघाने त्याला अनपेक्षितपणे विकत घेतल्यापासून त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

Shah Rukh Khan personal bodyguard Ravi Singh Salary
27 Photos
शाहरुखच्या बॉडीगार्डचा पगार किती आहे पाहिलं का? अनेक मोठ्या कंपन्यांच्या सीईओंपेक्षाही अधिक आहे Per Month Salary

आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगामधून सुखरुप घरी आणण्याची जबाबदारी शाहरुखने या आपल्या बॉडीगार्डवरच सोपवलेल्याचं पहायला मिळालं.

Aryan-Khan-Arthur-Road-Jail-1
10 Photos
Photo : आधी हाय कोर्टाची ऑर्डर, मग पुन्हा स्पेशल कोर्ट आणि नंतर आर्थर रोड जेलबाहेरचा बॉक्स! आर्यन खानच्या सुटकेसाठी ‘लंबी रेस’!

आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी त्याच्या तुरुंगातून सुटकेसाठी बरेच सोपस्कार पार पाडावे लागणार असून त्यासाठी…

11 Photos
Aryan Khan Bail Hearing : आर्यन खानच्या जामिनासाठी मुकुल रोहतगींनी केलेले १० प्रमुख युक्तिवाद

भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानसाठी युक्तिवाद केला. यापैकी १० प्रमुख युक्तिवादांचा हा आढावा.

10 Photos
छाप्याच्या आधीची भेट, २५ कोटींची मागणी ते १८ कोटींवरील सेटलमेंट, साक्षीदाराने समीर वानखेडेंचं नाव घेत केलेले ‘ते’ १० आरोप

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील फरार साक्षीदार के. पी. गोसावीच्या सुरक्षा रक्षकाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.…

family of shahrukh khan Aryan Khan
16 Photos
२००८ मध्येच शाहरुखने मुलांबद्दल व्यक्त केलेली ‘ती’ चिंता; म्हणालेला की, “माझ्या मुलांची…”

अनेकदा आर्यन खानचा जामीन फेटाळण्यात आल्यानंतर आता शाहरुखची ही जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आल्याचं चित्र दिसत आहे.