scorecardresearch

बिग बॉस मराठी ६ Photos

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६: महत्त्वाची माहिती

‘बिग बॉस मराठी ६’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात गाजलेला आणि तितकाच वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो आहे. तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा शो नव्या जोमाने आणि नव्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रत्येक सीझनप्रमाणेच यंदाही घरातील डावपेच, भांडणं, मैत्री आणि १०० दिवस येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहेत. अभिनेता रितेश देशमुख या शोचं सूत्रसंचालन करत असून, यावर्षी ‘दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार’ ही ‘बिग बॉस मराठी ६’ची थीम आहे.

१. शोचे वेळापत्रक (Bigg Boss Marathi Season 6 Schedule)

प्रेक्षकांना हा शो दररोज खालील वेळेत पाहता येईल-
चॅनेल: कलर्स मराठी (Colors Marathi)
वेळ (सोमवार ते शुक्रवार): रात्री ८ वाजता
वेळ (शनिवार आणि रविवार – भाऊचा धक्का): रात्री ८:०० वाजता
ऑनलाइन स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार

२. शोचा फॉरमॅट आणि संकल्पना

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये स्पर्धकांना बाहेरील जगाशी कोणताही संपर्क न ठेवता एका खास घरात राहावं लागतं. दर आठवड्याला दिले जाणारे टास्क, नॉमिनेशन प्रक्रिया आणि एलिमिनेशन यामुळे शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात कायम उत्सुकता असते. याशिवाय प्रेक्षकांनी दिलेले Votes देखील दर आठवड्याला एलिमिनेशन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

३. यंदाचे विशेष आकर्षण

रितेश देशमुखच्या होस्टिंगचं हे सलग दुसरं वर्ष आहे आणि त्याची हटके स्टाइल प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते.
नवीन टास्क आणि ट्विस्ट: यंदाच्या सीझनमध्ये आधीपेक्षा अधिक कठीण आणि मनोरंजक टास्क पाहायला मिळणार आहेत.
सेलिब्रिटी स्पर्धक: मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध चेहरे या सीझनमध्ये सहभागी झाले आहेत.

४. मागील सीझनमधील विजेते (Previous Season Winners)

‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर ज्यांनी आपलं नाव कोरलंय… त्या विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे-

सीझन १: मेघा धाडे
सीझन २: शिव ठाकरे
सीझन ३: विशाल निकम
सीझन ४: अक्षय केळकर
सीझन ५: सूरज चव्हाण

Bigg Boss Marathi Season 6 Contestants : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झालेले सदस्य

दिपाली भोसले–सय्यद (Deepali Bhosale Sayed) – अभिनेत्री-राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता
सागर कारंडे (Sagar Karande) – अभिनेता, कॉमेडियन
सचिन कुमावत (Sachin Kumavat) – खान्देशी गायक
सोनाली राऊत (Sonali Raut) – अभिनेत्री, सुपर मॉडेल
तन्वी कोलते (Tanvi Kolte) – अभिनेत्री
आयुष संजीव (Ayush Sanjeev) – अभिनेता
करण सोनावणे (Karan Sonawane) – कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर
प्रभू शेळके (Prabhu Shelke) – कंटेंट क्रिएटर
प्राजक्ता शुक्रे Prajakta Shukre) – गायिका
रुचिता जामदार (Ruchita Jamdar) – रिअ‍ॅलिटी शो स्टार
अनुश्री माने (Anushri Mane) – अभिनेत्री/ कंटेंट क्रिएटर
राकेश बापट (Raqesh Bapat) – मराठी व बॉलीवूड अभिनेता
रोशन भजनकर (Roshan Bhajankar) – फिटनेस इन्फ्लुएन्सर
दिव्या शिंदे (Divya Sunil Shinde) – राजकारणी
राधा पाटील (Radha Patil / Radha Mumbaikar) – नृत्यांगना
ओंकार राऊत (Omkar Raut) – हेअरस्टाइलिस्ट / इन्फ्लुएन्सर
विशाल कोटियन (Vishal Kotian) – अभिनेता
Read More
Anushri Mane Orange Bandhani Dress Look
9 Photos
Photos: ‘बिग बॉस’ मराठी फेम अनुश्री मानेच्या केशरी बांधणी ड्रेसमधील लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

अनुश्रीने बिग बॉसच्या घरात एक प्रबळ आणि धाडसी स्पर्धक म्हणून ओळख निर्माण केली होती.

Anushree Mane emotional post Riteish Deshmukh
9 Photos
Photos: ‘रितेश सर तुम्ही लय भारी…’अनुश्री मानेची रितेश देशमुखसाठी भावूक पोस्ट; ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

Big Boss marathi 6: १०० दिवसांचा अविस्मरणीय प्रवास आणि ‘भाऊच्या धक्क्या’वरील मार्गदर्शनाबद्दल अनुश्रीने मानले आभार

Bigg Boss Marathi 6 fame Reva Kaurase traditional look Siddhivinayak visit
9 Photos
Photos : ‘बिग बॉस मराठी ६’फेम रेवा कौरसे पोहोचली बाप्पाच्या चरणी; जांभळ्या साडीतील मराठमोळ्या लूकने वेधले लक्ष

Big boss Marathi season 6 : स्पर्धेचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर रेवाने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; कॅप्शनमधून व्यक्त केली मनातील भावना

bigg boss marathi 6 winner tanvi kolte know more about her exit from zee marathi lakshmi niwas serial
9 Photos
‘झी मराठी’च्या मालिकेतून Exit ते ‘बिग बॉस मराठी’ची विजेती! तन्वी कोलतेबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Bigg Boss Marathi Winner Tanvi Kolte : तन्वी कोलतेने जिंकली ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची ट्रॉफी, तिच्याबद्दल जाणून घ्या…

Anushree Mane royal pink look in Bigg Boss Marathi 6
9 Photos
Big Boss marathi 6: ‘भाऊच्या धक्क्या’वर अनुश्री मानेचा विशेष साज; गुलाबी ऑफ शोल्डर ड्रेसमधील लूकची चर्चा!

नक्षीदार गोल्डन बॉर्डरचा ड्रेस आणि कपाळावर छोटी टिकली; अनुश्रीचा हा लूक पाहून चाहते झाले घायाळ.

Tanvi Kolte Paithani Saree Look
9 Photos
Photos: ‘बिग बॉस मराठी’ फेम तन्वी कोलतेचं मोरपंखी रंगाच्या पैठणी साडीतील सौंदर्य

विशेष म्हणजे, ही तीच साडी आहे जी तन्वीने काही काळापूर्वी ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’मध्ये नेसली होती.

sonali raut reveals reason behind bigg boss marathi 6 exit says poor hygiene caused infection
9 Photos
Bigg Boss Marathi 6 मधून सोनाली राऊत ‘या’ कारणामुळे बाहेर; त्वचेसंदर्भात आजार झाल्याचा खुलासा करत म्हणाली…

१७ जणांसाठी एकच बाथरूम; Bigg Boss Marathi च्या घरातील हायजीनच्या समस्येमुळे सोनाली राऊतची शोमधून एक्झिट

bigg boss marathi 6 who is tanvi kolte left zee marathi serial and entered in bigg boss
9 Photos
‘झी मराठी’च्या मालिकेला रामराम ठोकला, सागर कारंडेशी भांडण; Bigg Bossचं घर गाजवणारी तन्वी कोलते आहे तरी कोण?

Bigg Boss Marathi 6 : ‘झी मराठी’च्या मालिकेत झळकलेली नायिका गाजवतेय ‘बिग बॉस’चं घर, जाणून घ्या तन्वी कोलतेबद्दल…

ताज्या बातम्या