scorecardresearch

बिग बॉस मराठी ६ Videos

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६: महत्त्वाची माहिती

‘बिग बॉस मराठी ६’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात गाजलेला आणि तितकाच वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो आहे. तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा शो नव्या जोमाने आणि नव्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रत्येक सीझनप्रमाणेच यंदाही घरातील डावपेच, भांडणं, मैत्री आणि १०० दिवस येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहेत. अभिनेता रितेश देशमुख या शोचं सूत्रसंचालन करत असून, यावर्षी ‘दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार’ ही ‘बिग बॉस मराठी ६’ची थीम आहे.

१. शोचे वेळापत्रक (Bigg Boss Marathi Season 6 Schedule)

प्रेक्षकांना हा शो दररोज खालील वेळेत पाहता येईल-
चॅनेल: कलर्स मराठी (Colors Marathi)
वेळ (सोमवार ते शुक्रवार): रात्री ८ वाजता
वेळ (शनिवार आणि रविवार – भाऊचा धक्का): रात्री ८:०० वाजता
ऑनलाइन स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार

२. शोचा फॉरमॅट आणि संकल्पना

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये स्पर्धकांना बाहेरील जगाशी कोणताही संपर्क न ठेवता एका खास घरात राहावं लागतं. दर आठवड्याला दिले जाणारे टास्क, नॉमिनेशन प्रक्रिया आणि एलिमिनेशन यामुळे शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात कायम उत्सुकता असते. याशिवाय प्रेक्षकांनी दिलेले Votes देखील दर आठवड्याला एलिमिनेशन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

३. यंदाचे विशेष आकर्षण

रितेश देशमुखच्या होस्टिंगचं हे सलग दुसरं वर्ष आहे आणि त्याची हटके स्टाइल प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते.
नवीन टास्क आणि ट्विस्ट: यंदाच्या सीझनमध्ये आधीपेक्षा अधिक कठीण आणि मनोरंजक टास्क पाहायला मिळणार आहेत.
सेलिब्रिटी स्पर्धक: मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध चेहरे या सीझनमध्ये सहभागी झाले आहेत.

४. मागील सीझनमधील विजेते (Previous Season Winners)

‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर ज्यांनी आपलं नाव कोरलंय… त्या विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे-

सीझन १: मेघा धाडे
सीझन २: शिव ठाकरे
सीझन ३: विशाल निकम
सीझन ४: अक्षय केळकर
सीझन ५: सूरज चव्हाण

Bigg Boss Marathi Season 6 Contestants : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झालेले सदस्य

दिपाली भोसले–सय्यद (Deepali Bhosale Sayed) – अभिनेत्री-राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता
सागर कारंडे (Sagar Karande) – अभिनेता, कॉमेडियन
सचिन कुमावत (Sachin Kumavat) – खान्देशी गायक
सोनाली राऊत (Sonali Raut) – अभिनेत्री, सुपर मॉडेल
तन्वी कोलते (Tanvi Kolte) – अभिनेत्री
आयुष संजीव (Ayush Sanjeev) – अभिनेता
करण सोनावणे (Karan Sonawane) – कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर
प्रभू शेळके (Prabhu Shelke) – कंटेंट क्रिएटर
प्राजक्ता शुक्रे Prajakta Shukre) – गायिका
रुचिता जामदार (Ruchita Jamdar) – रिअ‍ॅलिटी शो स्टार
अनुश्री माने (Anushri Mane) – अभिनेत्री/ कंटेंट क्रिएटर
राकेश बापट (Raqesh Bapat) – मराठी व बॉलीवूड अभिनेता
रोशन भजनकर (Roshan Bhajankar) – फिटनेस इन्फ्लुएन्सर
दिव्या शिंदे (Divya Sunil Shinde) – राजकारणी
राधा पाटील (Radha Patil / Radha Mumbaikar) – नृत्यांगना
ओंकार राऊत (Omkar Raut) – हेअरस्टाइलिस्ट / इन्फ्लुएन्सर
विशाल कोटियन (Vishal Kotian) – अभिनेता
Read More
Exclusive interview with Colors Marathi Programming Head Kedar Shinde
Bigg Boss Kedar Shinde Exclusive: अशोक सराफांसह मालिका, सूरज चव्हाणचं जिंकणं, केदार शिंदे म्हणाले..

Bigg Boss Marathi Kedar Shinde Exclusive: बिग बॉसच्या रेकॉर्डब्रेकिंग टीआरपीनंतर मराठी मनोरंजन विश्वात कलर्स मराठीची एक वेगळी चर्चा होऊ लागली…

Bigg Boss winner Suraj Chavan His Warm Welcoming In baramati
Suraj Chavan in Baramati: बिग बॉस विजेता सूरज चव्हाण परतला गावी, असं झालं स्वागत

मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण हा बारामतीतील आपल्या मुळगाव असणाऱ्या मोढवे येथे दाखल होताच गावकऱ्यांनी त्यांचं जंगी…

Dhananjay Powar bigg boss marathi exclusive targets varsha usgaonkar arbaaz ghanshyam saying influencers were given less importance
Big Boss Dhnanjay Powar: वर्षा ताईंबरोबर खटके उडण्यास कधी सुरुवात झाली?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात टॉप चार पर्यंत पोहोचलेला सदस्य धनंजय पोवार यांनी घरातून बाहेर आल्यानंतर त्याचा अनुभव सांगितला. वर्षा…

Big boss marathi ankita prabhu walawalkar speaks about her kokan hearted boy and their marriage plan
Big Boss Ankita walawalkar: अभिजीतपेक्षा सूरज जिंकल्याचा आनंद, अंकिता स्पष्टच बोलली

बिग बॉसच्या घरात कोकण हार्टेड ते महाराष्ट्र हार्टेड गर्ल असा प्रवास करणारी अंकिता प्रभू वालावलकर हिला टॉप ५ मधूनच माघारी…

Bigg boss marathi winner suraj chavan first reaction after winning says ritesh deshmukh promised me manager genelia reacts
Big Boss Suraj Chavan: रितेश देशमुखने सूरजला दिला शब्द, जिनीलिया वहिनी काय म्हणाली?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. बिग बॉसची ट्रॉफी मिळाल्यानंतर सूरजने त्याच्या घरातील प्रवासाविषयी लोकसत्ताशी साधलेला…

ताज्या बातम्या