scorecardresearch

चांद्रयान ३ Photos

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) – लघुस्वरुपात ‘इस्रो’ (ISRO) ही भारतातील प्रमुख शासकीय संस्था आहे. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट अंतराळ संशोधन करणे हे आहे. या संस्थेद्वारे अंतराळाशी संबंधित अनेक प्रकल्प राबवले जातात. यामध्ये चांद्रायन, मंगळयान तसेच आदित्य एल-१ प्रकल्प, गगनयान प्रकल्प यांसारख्या काही प्रकल्पांचा समावेश होतो. इस्रोने काही महिन्यापूर्वी चांद्रयान ३ (chandrayaan 3)हे अवकाश यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले. चंद्राच्या या भागावर अंतराळयान पाठवणारा भारत हा पहिला आणि एकमेव देश आहे. २००८ मध्ये भारताने पहिल्यांदा चंद्रावर स्वारी केली. तेव्हा चांद्रयान १ हे चंद्राच्या जवळ पाठवण्याच्या प्रयत्नांना भारताला यश मिळाले. पुढे चांद्रायन २ या मोहिमेला सुरुवात झाली.

२०१९ मध्ये तांत्रिक बिघाडामुळे शेवटच्या क्षणी चांद्रायन २ मोहीम अयशस्वी ठरली. २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या या अंतराळयानाचे लॅंडर आणि रोव्हर चंद्रावर पोहचण्याआधीच क्रॅश झाले. या घटनेमुळे खचून न जाता इस्रोमधील वैज्ञानिकांनी चांद्रयान ३ प्रकल्पाची तयारी करायला सुरुवात केली. इतर संशोधन संस्था आपल्या अंतराळ संशोधनामध्ये बक्कळ पैसे करत असताना इस्रोने दिलेल्या बजेटमध्ये चांद्रयान ३ मोहिमेची पूर्वतयारी पूर्ण केली. १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २.३५ वाजता चांद्रयान ३ चे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आले.

या यानामध्ये विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान नावाच्या रोव्हरचा समावेश करण्यात आला होता. हे लॅंडर आणि रोव्हर अपयशी ठरलेल्या चांद्रयान २ मध्येही होते. चंद्रावर उतरताना झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न चांद्रयान ३ मध्ये केला होता. १४ जुलै रोजी भारतातून प्रक्षेपित झालेले चांद्रयान ३ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले. चांद्रायन ३ मोहीम फत्ते झाल्याने भारताचे अंतराळ संशोधनात मोठे नाव झाले.
Read More
Gaganyaan 1 to Mangalyaan 2, ISRO will launch these 6 space missions in 2024
7 Photos
गगनयान १ ते मंगळयान २; २०२४ मध्ये ISRO च्या सहा अवकाश मोहिमा, भारत कोणकोणत्या ग्रहांवर तिरंगा फडकवणार

इस्रोने २०२३ मध्ये चांद्रयान ३ आणि आदित्य एल१ सह अनेक यशस्वी अवकाश मोहिमा राबवल्या. भारताची ही अंतराळ संशोधन संस्था पुढच्या…

PM Nanrendra modi in isro
14 Photos
PHOTOS : “विक्रमचा विश्वास आणि प्रज्ञानचा पराक्रम”, वैज्ञानिकांसाठी मोदींचे प्रेरणादायी भाषण

PM Narendra Modi in ISRO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वैज्ञानिकांचे आभार मानत…

isro moon mission Chandrayaan 3
21 Photos
Chandrayaan 3: चांद्रयान 3च्या सॉफ्ट लँडिंगनंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण; फोटो बघून येईल डोळ्यात पाणी

23 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण याच दिवशी भारताने चंद्रावर पाऊल ठेवत जगाला आपली ताकद दाखवून…

Chandrayaan-3 Landing South Pole Importance
15 Photos
Chandrayaan-3: दक्षिण ध्रुव भागातच ‘चांद्रयान-३’ का उतरले? जाणून घ्या सविस्तर

चंद्रावर पोहोचण्याची किमया करणारा भारत हा चौथा देश असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘पाऊल’ ठेवणारा भारत पहिलाच.

miraculous plants can survive on the moon
12 Photos
Photos: चंद्रावरही जिवंत राहू शकतात ‘या’ चमत्कारी वनस्पती; संशोधनातून समोर आली माहिती

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. संपूर्ण देशाची ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

Chandrayaan 3 Landing 11
24 Photos
Photos : चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताना शेवटच्या २२ सेकंदात नेमकं काय घडलं? पाहा…

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे होतं. अखेर जगाने तो ऐतिहासिक क्षण पाहिला. या मोहिमेत…

india chandrayaan 3 moon mission do you know who sells the land of lunar who is the owner and where is its registry
6 Photos
चंद्रावर आत्तापर्यंत ‘या’ भारतीयांनी खरेदी केली जमीन; पण चंद्रावरील जमिनीचा खरा मालक कोण, त्याची रजिस्ट्री कुठे होते? जाणून घ्या

भारताच्या चांद्रयानाप्रमाणेच इतर अनेक देश चंद्राचा अभ्यास करत आहेत. अलीकडेच, रशियाचे लुना-25 देखील चंद्रावर पाठवण्यात आले होते. वृत्तानुसार, चांद्रयानापूर्वी त्याचे…

ताज्या बातम्या