जपानचं स्लिम मून मिशन यशस्वी झालं आहे. या चांद्रमोहिमेअंतर्गत जपानने त्यांचं अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं आहे. याद्वारे जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या आधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीन हे देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले आहेत. स्लिम म्हणजे स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टिगेटिंग मून मिशन (SLIM – Smart Lander for Investigating Moon). या यशस्वी मोहिमेनंतर जपानची अंतराळ संशोधन संस्था JAXA चं जगभरात कौतुक होत आहे.

गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी जपानी अंतराळ संशोधन केंद्राचं हे अवकाशयान चंद्राच्या दिशेनं झेपावलं होतं. चार महिन्यांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. २५ डिसेंबर रोजी या यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. या यानाची लांबी २.४ मीटर आणि रुंदी २.७ मीटर इतकी आहे. या यानाच्या लँडरचं वजन २०० किलो इतकं आहे. यामध्ये रडार, लेजर रेंज फाइंडर आणि व्हिजन बेस्ड नेव्हिगेशन सिस्टिम आहे.

gadchiroli lok sabha , sironcha polling station, evm technical glitch, new evm machine, aheri, helicopter, lok sabha 2024, election 2024, polling station, polling day, gadchiroli news, gadchiroli polling news,
ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, सिरोंचातील मतदान केंद्रावर गोंधळ; अहेरीवरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात…
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….

या अवकाशयानावरील कॅमेरे चंद्राच्या पृष्ठभागाचे, तिथल्या दगड-मातीचे स्पष्ट फोटो क्लिक करतील आणि ते JAXA ला पाठवले जातील. तसेच यामध्ये लुनार एक्स्पोरेशन व्हेईकल आणि लुनार रोबोटदेखील आहे. यामध्ये वापरण्यात आलेलं पिन पॉइंट लँडिंग तंत्रज्ञान हे अशी अवकाशयानं इतर ग्रहांवर उतरवण्यासाठी योग्य आहें असं JAXA ने म्हटलं आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील लँडिंग केलेल्या जागेपासून १०० मीटरपर्यंतच्या परिसराचं सर्वेक्षण केलं जाईल, असंही JAXA ने सांगितलं आहे.

लँडिंग साईट आहे ‘खास’

ज्या जागेवर हे यान उतरवण्यात आलं त्या लँडिंग साईटला शिओली क्रेटर असं नाव देण्यात आलं आहे. हा चंद्रावरील सर्वाधिक गडद अंधार असलेला परिसर आहे. चंद्राचा पृष्ठभाग पाहिल्यास त्यावरील एक सर्वाद गडद काळा डाग म्हणजे ही लँडिंग साईट आहे. चंद्रावर असा आणखी एक डाग (गडद अंधार असलेला प्रदेश) आहे. मेयर नेक्टारिस असं त्या साईटचं नाव आहे. या जागेला चंद्राचा समुद्रदेखील म्हटलं जातं. जपाने अंतराळ संशोधन केंद्र आता शिओली क्रेटर प्रदेशात संशोधन करणार आहे.

हे ही वाचा >> विश्लेषण : पाकिस्तान-इराणमध्ये युद्ध भडकेल का? चीनची मध्यस्थी कितपत यशस्वी होईल?

चौथ्या प्रयत्नात यश

जपानने यापूर्वीदेखील अनेकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यावेळी त्यांना यशाने हुलकावणी दिली होती. जपानने चंद्राच्या दिशेने पाठवलेल्या ‘ओमेतेनाशी’ या अवकाशयानाचा प्रवासादरम्यान संपर्क तुटला होता. जे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लँड होणं अपेक्षित होतं. त्याआधी एप्रिल महिन्यात ‘हाकूतो-आर’ हे यान चंद्रावर लँड करण्यासाठी लाँच करण्यात आलं होतं. परंतु, हे यान चंद्रावर क्रॅश झालं होतं. तर ऑक्टोबर २०२२ मध्ये ‘एप्सिलॉन’ रॉकेट चंद्रावर पाठवलं जाणार होतं. परंतु, लाँचिंगच्या वेळी या रॉकेटचा स्फोट झाला होता.