चंद्रयान ३ च्या यशानंतर आता गगनयान मोहीमेची चर्चा सुरु झाली आहे. चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याने इस्रोचे नाणे जागतिक पटलावर खणखणीत वाजले आहे. गेल्या काही वर्षात इस्रोने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचे दगड गाठले आहेत. विविध कृत्रिम उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित करण्याचा धडाकाही इस्रोने सुरुच ठेवला आहे. तेव्हा आता पुढे कोणती मोहीम, कधी, केव्हा अशी चर्चा सुरु आहे.

सध्या इस्रोने गगनयान मोहीमेकडे लक्ष केंद्रीय केलं आहे. या मोहीमेच्या माध्यमातून स्बबळावर भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवला जाणार आहे. असं करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. बलाढ्य युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, कॅनडा यांनाही हे अजुनतरी शक्य झालेलं नाही.मात्र गगनयान मोहीमेची चर्चा सुरु असतांनाच भारतीय अंतराळवीर चंद्रावर कधी उतरणार असा प्रश्न इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांना विचारण्यात आला असता त्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.

raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
ग्रामविकासाची कहाणी
moosewala baby ivf treatment
सिद्धू मुसेवालाच्या आईने आयव्हीएफ नियमांचे पालन केलं नाही? आरोग्य मंत्रालयाने पंजाबला विचारला जाब

हेही वाचा… Gaganyaan Mission : राकेश शर्मानंतर कोणते भारतीय अंतराळवीर अवकाशात जाणार ? पंतप्रधान मोदींनी जाहिर केली चार नावे….

“अवकाशात गुरुत्वाकर्षण शुन्य असते.त्याबाबत विविध तंत्रज्ञान विकसित केले जात आहे ज्याचा गगनयान मोहिमेत वापर केला जाणार आहे.मात्र त्यापलिकडे चंद्रापर्यंत समानव पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान विकसित करावं लागणार आहे. चंद्रावर समानव पोहचणे हा एक अपघात नसेल तर त्यासाठी सातत्याने चंद्रावर मोहिमा आखाव्या लागतील, त्यानंतर हे प्रत्यक्षात येईल. हे सर्व खूप खार्चिकही असेल. तेव्हा सातत्य ठेवत आपल्याला हवं ते साध्य करता येईल, २०२४० पर्यंत चंद्रावर समानव उतरता येईल. जगभरातील अनेक देश हे चंद्राच्या बाबतीत जास्त लक्ष देत आहेत. विशेषत अमेरिका, चीनसारखे देश का लक्ष देत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे.”

हेही वाचा… Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live: “जब बिजली चमकती है, तो…”, महिला शक्तीचा उल्लेख करताना अजित पवारांची शायरी!

सोमनाथ पुढे म्हणाले की २०२८ पर्यंत भारताचे अवकाश स्थानक अवकाशात प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा प्रयत्न असेल. पुर्ण क्षमेतेचे अवकाश स्थानक हे २०३५ पर्यंत पुर्ण झालेलं असेल ज्यामध्ये अंतराळवीर दिर्घकाळ वास्तव्य करेल. यासाठी अवकाशात दिर्घकाळ वावर करण्याच्या प्रयत्नांकडे लक्ष दिले जाईल. एवढंच नाही तर शुक्र ग्रहावरील मोहिम, चंद्रयान ३ मोहीमेप्रमाणे मंगळ ग्रहावर लँडर मोहिमेचा विचार सुरु असल्याचं इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितलं.