Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

क्रिकेट विश्वचषक २०२३ Videos

सध्या भारतासह जगभरात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (Cricket World Cup)चर्चा सुरु आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे आहे. भारतामधील विविध स्टेडियम्समध्ये सध्या जागतिक स्तरावरील सामने होत आहे. २०११ नंतर तब्बल २३ वर्षांनी भारताकडे विश्वचषकाचे यजमानपद आहे. २०११ च्या विश्वचषकामध्ये भारतासह बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याकडे यजमानपदाची जबाबदारी आहे. मात्र २०२३ च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामने भारतामध्ये खेळले जात आहे. 


 


क्रिकेट विश्वचषक २०२३ (Cricket World Cup 2023) या स्पर्धेमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅंड्स, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या १० संघाचा समावेश करण्यात आला आहे. दिवसाला कधी एक, तर कधी दोन असे एकूण ४८ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने विश्वचषकामध्ये होणार आहेत. या वर्षीच्या विश्वचषकाची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत अनेक रोमहर्षक सामने पाहायला मिळाले आहेत. या सामन्यांवरुन ट्रॉफी जिंकण्याची ही स्पर्धा अधिक रंजक होणार आहे असे दिसत आहे. क्रिकेटच्या या सर्वोच्च स्पर्धेचा शेवट १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.


 


८ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाने विश्वचषक २०२३ मध्ये आपला पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला. त्या सामन्यापासून भारतीय क्रिकेट संघाचा विजय रथ विक्रमी वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. भारतीय संघाने इतर स्पर्धेत आक्रमक पवित्रा दाखवला आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टींमध्ये संघाने चांगला खेळ करुन दाखवला आहे. पुढील सामन्यांमध्येही भारत अशीच कामगिरी करुन २०११ वर्षाची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा प्रत्येक भारतीयाला आहे.


Read More
world cup
क्रिकेटप्रेमींसाठी विश्वचषकातील प्रत्येक घडामोड, पाहा रवी पत्कींसह फक्त ‘लोकसत्ता’वर | WorldCup 2023

क्रिकेटप्रेमींसाठी विश्वचषकातील प्रत्येक घडामोड, पाहा रवी पत्कींसह फक्त ‘लोकसत्ता’वर | WorldCup 2023

ताज्या बातम्या