scorecardresearch

दिवाळी २०२३ Videos

आपला भारत (India) देश शेतीप्रधान असल्यामुळे आपल्याकडचे बरेचसे सण हे शेतीच्या ठराविक काळानुरुप येत असतात. त्यातील एक सण म्हणजे दिवाळी. दिपावली किंवा दिवाळी सण हिंदू धर्मीयांसाठी फार महत्त्वपूर्ण सण आहे. या काळामध्ये शेतामधील पिक आलं असून त्याची कापणी, झोडपणी ही प्रक्रिया सुरु असते.

घरामध्ये धान्य लक्ष्मीच्या रुपाने आल्याने दिवाळी सण साजरा केला जातो. भगवान राम वनावास संपवून सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोद्धेला परतले त्यादिवशी दिवाळी (Diwali 2023) साजरी करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हटले जाते.

दिवाळसणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या दिवसांचे महत्त्व असते. याच काळामध्ये लक्ष्मीपूजन देखील केले जाते. अश्विन कृष्ण द्वादशीला दिवाळीला सुरुवात होते. यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी सुरु होणार आहे.
Read More

ताज्या बातम्या