scorecardresearch

कर्नाटक निवडणूक Videos

कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी होत आहे. कर्नाटक विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २२४ आहे. त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण ५ कोटी १ लाख मतदार सहभागी होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या ८०हून जास्त वयाच्या मतदारांची संख्या तब्बल १२.१५ लाख इतकी आहे. या निवडणुकीत ९ लाख १७ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या ५८ हजार २८२ तर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ८८३ मतदार मतदान करतील. १३२० मतदान केंद्र पूर्णपणे महिलांकडून सांभाळली जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली. कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी आणि निकाल १३ मे रोजी लागणार आहे.

कर्नाटकमध्ये २०१८ साली झालेल्या २२२ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवत कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरी बहुमतापासून त्यांना दूर राहावे लागले. काँग्रेसने ७८ तर जेडीएसने ३७ जागा मिळवल्या होत्या. तर बहुजन समाज पक्ष १, कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी १ आणि अपक्ष १ असे इतर उमेदवार निवडून आले होते. बहुमताचा आकडा ११२ असल्यामुळे २०१८ साली विधानसभा त्रिशंकू झाली होती.

येडियुरप्पा यांनी सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे त्यांचे सरकार गडगडले. त्यानंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (JDS) संयुक्त सरकार सत्तेत आले. पण काँग्रेस व जनता दलाचे आमदार २०१९ साली फुटल्याने एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार १४ महिन्यांतच कोसळले. त्यानंतर पुन्हा येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. जुलै २०२१ मध्ये येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून भाजपने मूळ जनता दलातून आलेल्या बसवराज बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली.

कर्नाटक विधानसभेच्या मागच्या काही निवडणुकांचा कल पाहिला तर कोणत्याही पक्षाला आपल्या सलग दोन निवडणुकीत बहुमत मिळवता आलेले नाही. २००८ साली भाजपाने ११० जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. तर २०१३ साली काँग्रेसने १२२ जागा जिंकून सरकार स्थापन केले. त्यानंतर पुन्हा २०१८ साली सुरुवातीला भाजपा, त्यानंतर काँग्रेस-जेडीएस आणि त्यानंतर दीड वर्षातच पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन झाले होते. त्यामुळे यंदा २०२३ साली कुणाचे सरकार स्थापन होणार, हे पाहण्यासाठी १३ मे ची वाट पाहावी लागेल.
Read More
karnataka
New Cabinet of Karnataka: कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश?; जाणून घ्या | Siddaramaiah

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. दरम्यान, आजच…

MNS Raj Thackeray criticizes BJP and Ashish Shelar
Raj Thackeray: “यांचं अस्तित्व मोदींमुळे…”; राज ठाकरेंची आशिष शेलारांसह भाजपावर बोचरी टीका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १६५ जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं तर भाजपाला ६६ जागांसह दारुण पराभव स्वीकारावा लागला. यावरून मनसे अध्यक्ष…

5 reasons for BJPs defeat in Karnataka assembly election Loksatta Editor Girish Kubers Explained
कर्नाटकात भाजपाच्या पराभवाची ५ कारणं गिरीश कुबेर यांच्या शब्दांत! |Girish kuber |Karnataka Elections

कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपासाठी प्रचार केला…

Shivakumar Get emotional after victory in Karnataka assembly election
Karnataka Assembly Elections: ‘गांधी कुटुंबाने माझ्यावर …’; कर्नाटकातील विजयानंतर शिवकुमार भावूक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाल्यानंतर काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार भावूक झालेले पाहायला मिळाले प्रतिक्रिया देताना ते म्हणाले…

My father should be made Chief Minister to keep BJP out of power - Yathindra Siddaramaiah
Karnataka Assembly Elections: ‘भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी…’; काँग्रेस नेत्याच्या मुलाची मागणी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडलं. भाजपा, काँग्रेस, जनता दल ( धर्मनिपेक्षक ) यांच्यात प्रमूख लढत झाली.…

ताज्या बातम्या