देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना विरोधक-सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र काही वेळा कमरेखालची टीका झाल्यामुळे वादही निर्माण होतात. कर्नाटकमध्ये परंपरागत विरोधकांमध्ये सध्या असाच एक वाद सुरू आहे. बेळगाव ग्रामीणचे भाजपा पक्षाचे माजी आमदार संजय पाटील यांनी विद्यमान आमदार आणि कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर अश्लाघ्य टीका केली आहे. शनिवारी एका जाहीर सभेत बोलत असताना संजय पाटील यांनी हेब्बाळकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले.

त्यांना एक जास्तीचा पेग घ्यावा लागत असेल

बेळगावमधील हिंडलगा येथे शनिवारी (दि. १३ एप्रिल) भाजपाचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात संजय पाटील म्हणाले, “बेळगाव मतदारसंघात भाजपाला महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना धडकी भरली आहे. त्यांना रात्रीची झोपही लागत नसेल. तसेच माजी मंत्री रमेश जारकीहोळी आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे रात्री झोप लागण्यासाठी हेब्बाळकर यांना एक पेग जास्तीचा घ्यावा लागत असेल.”

ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
shalini patil vishal patil
शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”

सीडी प्रकरणानंतर राजकारणाला मिळाली कलाटणी

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा म्रिनल हा बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे संजय पाटील यांनी हेब्बाळकर यांच्यावर टीका केली. रमेश जारकीहोळी आणि हेब्बाळकर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिले आहेत. मार्च २०२१ मध्ये जारकीहोळी यांची एक अश्लील सीडी स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. त्यानंतर कर्नाटकमध्ये मोठा वाद उद्भवला होता. या सीडी प्रकरणात हेब्बाळकर यांचा हात असल्याचा जारकीहोळी यांचा आरोप होता. तेव्हापासून रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातून विस्तवही जात नाही.

संजय पाटील यांच्या टीकेनंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, भाजपाच्या माजी आमदाराने फक्त माझाच नाही तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. भाजपाचा महिलांप्रती दृष्टीकोन कसा आहे? हे यातून दिसून येते. भाजपाचे नेते राम नामाचा जप करतात, बेटी बचावो, बेटी पढाओ म्हणतात, पण हे सर्व वरकरणी आहे. भाजपाच्या मनात काय आहे? हे संजय पाटील यांच्या ओठावर आले आहे.

बेळगावमध्ये म्रिनल हेब्बाळकर यांच्या विरोधात भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर निवडणुकीसाठी उभे आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर एका जाहीर सभेत म्हणाल्या की, शेट्टर यांना मागच्यावर्षी भाजपाने आमदारकीचे तिकीट नाकारले, तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण विधानसभा निवडणुकीत पराभव होताच काही महिन्यातच त्यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला.

दरम्यान संजय पाटील यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धडक दिली. घोषणाबाजी करत संजय पाटील यांनी हेब्बाळकर यांची माफी मागावी, अशी मागणीही या महिलांनी केली.