Rajyasabha Election Karnataka कर्नाटकातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. कुपेंद्र रेड्डी राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २७ फेब्रुवारीला होणार्‍या राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांनी पाचवा उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. कुपेंद्र रेड्डी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली १२०० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली. त्यांना जेडी(एस)-भाजपा युतीने रिंगणात उतरवले आहे. जेडी(एस)-भाजपा युतीचा पाचवा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे.

काँग्रेसच्या अडचणीत वाढ?

कर्नाटक विधानसभेतील संख्याबळ पाहता, काँग्रेसला तीन आणि भाजपाला एक जागा मिळण्याची खात्री होती. परंतु, पाचवा उमेदवार रिंगणात उतरणे हे काँग्रेससाठी आव्हान समजले जात आहे. “काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. पक्षात अनेक असंतुष्ट व्यक्ती आहेत; ज्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो,” असे जेडी(एस)-भाजपा युतीमधील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

Loksatta anvyarth President Mohamed Muizzu People National Congress wins Maldivian elections
अन्वयार्थ: मुईझ्झूंची मुजोरी वाढवणारा विजय…
Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
Rahul Gandhi do a miracle
काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?
vijendar singh joins bjp
काँग्रेसला ‘ठोसा’ देत ऑलिम्पिक पदकविजेत्या बॉक्सरचा भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या ‘रिंग’मध्ये प्रवेश; कारण काय?

२०२२ च्या राज्यसभा निवडणुकीत दोन जेडी(एस) आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते; ज्यामुळे रेड्डी यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीतील काँग्रेसच्या रणनीतीनंतर जेडी(एस) नेते एच. डी. कुमारस्वामी सतर्क झाले आहेत. काँग्रेसने २०२२ च्या निवडणुकीत रेड्डी यांना मिळणारी मते कमी करण्यासाठी मन्सूर अली खान यांना अतिरिक्त उमेदवार म्हणून उभे केले होते. जेडी (एस)च्या दोन आमदारांनी क्रॉस व्होट केल्यावर ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते. मात्र, ही जागा भाजपा उमेदवार लहरसिंग यांनी जिंकली होती.

राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी २२४ आमदारांच्या कर्नाटक विधानसभेत उमेदवाराला किमान ४५ मतांची आवश्यकता असते. १३५ आमदार असलेल्या काँग्रेसकडे तीन उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे. या निवडणुकीसाठी केंद्रीय काँग्रेस नेते अजय माकन ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची निवड मानले जात आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे विश्वासू मानले जाणारे नसीर हुसेन व पक्षाचे विश्वासू जी. सी. चंद्रशेखर अशा तीन उमेदवारांना काँग्रेस उभे केले आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना तीन अपक्षांचा पाठिंबा मिळणार असल्याचीही खात्री आहे.

भाजपाकडे ६६ आमदार आहेत. भाजपाचे प्रमुख उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते नारायणसा भंडगे सहज निवडून येऊ शकतात. विधानसभेत जेडी(एस)चे १९ आमदार आहेत. भाजपाच्या उरलेल्या आमदारांची मते आणि जेडी(एस) आमदारांची मते एकत्र केल्यास रेड्डी यांना विजयी होण्यास मदत होईल. तीन अपक्ष आमदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केल्यास, काँग्रेस उमेदवाराची मते ते कमी करू शकतील. त्यामुळे काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंग होण्याचीही शक्यता आहे. इथे त्यांची ‘मनी पॉवर’ मोठी भूमिका बजावू शकते.

काँग्रेस नेते, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आरोप केला की, कुमारस्वामी यांनी जेडी(एस)-भाजपाच्या पाचव्या उमेदवाराच्या वतीने काही काँग्रेस आमदारांशी संपर्क साधला होता. “ते कोणाला कॉल करत आहेत, ते काय बोलत आहेत आणि कोणाला धमकावत आहेत हे आम्हाला माहीत आहे. आमच्या आमदारांनी त्यांना आलेल्या ऑफरबद्दल सांगितले आहे. आम्हालाही भाजपाची रणनीती माहीत आहे,” असे शिवकुमार म्हणाले. रेड्डी यांचा काँग्रेसशी जुना संबंध आहे. २००८ ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. अलीकडच्या वर्षांत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांसारख्या भाजपाच्या प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या युतीच्या बैठकांमध्येही ते सहभागी झाले.

रेड्डी यांचा आयटी पार्क्सच्या उभारणीत मोठा वाटा आहे. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत. बंगळुरूमध्ये कारविक्रीपासून ते बांधकामांपर्यंत अनेक व्यवसायांचे ते मालक आहेत. तसेच ते कर्नाटक प्रीमियर लीगमधील म्हैसूर क्रिकेट संघाचेही मालक आहेत.

कर्नाटकातील क्रॉस व्होटिंगचा इतिहास

कर्नाटक राज्यसभा निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगच्या दीर्घ इतिहासामध्ये २०१६ च्या घटनेचा समावेश आहे. या निवडणुकीदरम्यान जेडी(एस)च्या ४० पैकी आठ आमदारांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले होते. बी. एम. फारूक यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्यात आले होते. त्यानंतर या आठही आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यातील अनेक जण आता काँग्रेसचे आमदार आहेत.

हेही वाचा : अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष अडचणीत का?

जेडी(एस)चा क्रॉस व्होटिंगचा इतिहास राहिला आहे. २७ फेब्रुवारीला याचा प्रत्यय येईल, असा दावा एका काँग्रेस नेत्याने केला आहे. “२७ फेब्रुवारीला त्यांचे बरेच आमदार क्रॉस व्होटिंग करतील. जेडी(एस) पुन्हा अडचणीत येईल; काँग्रेस नाही,” असे काँग्रेस नेत्याचे सांगणे आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मतभेद आहेत; परंतु त्यांनी निवडणुकीसाठी हे मतभेद बाजूला ठेवले आहेत, असेही त्यांनी संगितले.