काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे. आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे सांगणारा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला अधिक रंगात आणण्यासाठी वैभव जोशी यांच्या ‘सोबतीचा करार’ या संगीत मैफलचेही आयोजन यावेळी करण्यात आले. यात स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर, पवनदीप राजन यांचाही सहभाग होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी ‘काय चुकले सांग ना?’ या मनाला स्पर्शून जाणाऱ्या गाण्याच्या काही ओळी गायल्या.

वसंत मोरेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Marathi singer juilee joglekar answer to trollers whos call old lady and talk about her teeth
म्हातारी म्हणणाऱ्यांना अन् दातावरून हिणवणाऱ्यांना जुईली जोगळेकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “स्वतःची अक्कल…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

गोविंदाच्या भाचीच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, होणाऱ्या पतीने शेअर केला अभिनेत्रीचा खास फोटो

‘जुनं फर्निचर… या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !” ट्रेलरवरूनच हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे, हे कळतेच. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडणार याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते. परंतु ती चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात? वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा असते. ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल, तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी, असा प्रश्न ट्रेलर पाहून मनात उद्भवतो. आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ चे यतिन जाधव निर्मित ‘जुनं फर्निचर’ची कथा, पटकथा, संवाद महेश वामन मांजरेकर यांनी लिहिले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कडेवर बाळ खेळवताना दिसली गौतमी पाटील, बीचवरचे सुंदर फोटो केले शेअर, वनपीस ड्रेसने वेधलं लक्ष

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, “जुनं फर्निचर… या नावातच चित्रपट काय आहे, याचा संदर्भ लागतो. अनेक घरांमध्ये हल्ली असे चित्र दिसतेय. बाहेरही अनेक ठिकाणी ज्येष्ठांना जुनं फर्निचर म्हणूनच संबोधले जातेय आणि याबाबतचा किस्सा मी स्वतः पाहिला आहे. त्यातूनच मला हा विषय सुचला. मी या चित्रपटाबद्दल एकच सांगेन ‘जुनं फर्निचर’ला कमी समजू नका. त्यांच्यात जी ताकद आहे, ती आताच्या तकलादू फर्निचरमध्ये अजिबात नाही. ही ताकद फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही तितकीच खमकी आहे. हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या मुलांसोबत नक्की पाहावा, त्यातून कदाचित मुलांचा दृष्टीकोन बदलेल.”