मृण्मयी देशपांडे सध्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मृण्मयी अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. मृण्मयी आणि तिचा पती स्वप्निलचं महाबळेश्वरला फार्म हाऊस आहे. तिथले बरेच व्हिडीओ मृण्मयी शेअर करीत असते.

मृण्मयी आणि स्वप्निलने त्यांच्या शेतावर मातीचं सुंदर असं एक नवीन घर बांधलं आहे. त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर दोघांनी याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये स्वप्निल म्हणतो, “आम्ही आमच्या नवीन मातीच्या घरात प्रवेश करतोय. अजून दारं-खिडक्या लागलेल्या नाहीत आणि खूप फिनिशिंगही बाकी आहे. पण, ही जी काय मजा आहे…”

या नवीन घरात विटांची चूलदेखील त्यांनी तयार केलीय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त या घरासमोर दोघांनी मोठी गुढी उभारली आहे. ‘शेतावरती काहीतरी नवं… हातांनी बांधलेलं… प्रेमानं बांधलेलं…’ असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर अन् ‘ती’ आठवण; जयंतीनिमित्त गौरव मोरेने शेअर केला खास फोटो

या घराचा व्हिडीओ पाहून अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सुव्रत जोशीने कमेंट करीत लिहिलं, “किती सुंदर”. तर भूषण प्रधानने हार्टचे इमोजी वापरून प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा… “कोणतीही कारवाई…”, शूज चोरणाऱ्या डिलीव्हरी बॉयची सोनू सूदने घेतली बाजू; पण, नेटकऱ्यांनी केला विरोध

“किती सुंदर, मातीचा सुगंध इथपर्यंत येतोय”, “सुख म्हणजे नक्की काय असतं”, “वाह ताई! खूप सुंदर प्रेमाचं घर”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांकडून आल्या आहेत.

हेही वाचा… स्वप्नील जोशीने घेतलं रामलल्लाचं दर्शन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “याची देही याची डोळा…”

दरम्यान, मृण्मयीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर योगेश देशपांडे दिग्दर्शित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या आगामी चित्रपटात मृण्मयी झळकणार आहे. १ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Story img Loader