scorecardresearch

पृथ्वीराज चव्हाण News

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. तसंच त्याआधी ते दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासमवेत काँग्रेस कार्यालयात कार्यरत होते. काँग्रेसमध्ये जी २३ हा जो गट तयार झाला त्यातले महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण होते. तसंच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे, लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडला गेला पाहिजे अशीही भूमिका त्यांनी मांडली होती.


पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळाले. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी त्याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, चीन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचे सरकारी खर्चाने दौरे केले आहेत.


Read More
Prithviraj Chavan Kolhapur Visit | पृथ्वीराज चव्हाण शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद कोल्हापूर भाषण
Prithviraj Chavan : विद्यापीठे पदवीदानाची नव्हे ज्ञाननिर्मितीची सक्रिय केंद्रे व्हावीत – पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेच्या २८ व्या राष्ट्रीय अधिवेशनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण पद्धतीवर भाष्य केले.

davos-investment-deals-white-paper-demand-prithviraj-chavan
दावोसमध्ये स्थानिक कंपन्यांशी करार का ? गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढा- काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दावोस दौऱ्यातील ३० लाख कोटींच्या करारांबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मोठ्या आकड्यांऐवजी प्रत्यक्ष…

Prithviraj chavan on devendra fadnavis
Prithviraj Chavan : “हा तर एक क्रूर विनोद”, दावोसमधील गुंतवणुकीवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका

दावोस आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात विक्रमी ३० लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे करार करण्यात आले असून येत्या महिनाभरात आणखी १० लाख…

Former Chief Minister Prithviraj Chavan comment pune metro smart city hyperloop project
पुण्यातील मेट्रोचे श्रेय कोणाचे? काँग्रेस की भाजपचे?

Pune Municipal Corporation Election : काँग्रेसच्या ‘पुणेकरांचा अधिकारनामा’ या जाहीरनाम्याचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकार…

Congress leader Prithviraj Chavan sparked a row with his comment on PM Narendra Modi
‘डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे नरेंद्र मोदींनाही किडनॅप करतील का?’ पृथ्वीराज चव्हाणांचा धक्कादायक प्रश्न

व्हेनेझुएलामध्ये जे घडलं तसंच भारतातही काही घडेल का? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अपहरण डोनाल्ड ट्रम्प करतील का? आता…

prithviraj Chavan
“मराठी पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले नसतील तर..”; पृथ्वीराज चव्हाण यांचा नवा दावा काय?

एपस्टिन फाईल संदर्भात अजूनही अमेरिकेत मोठा संघर्ष सुरू आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

शिवसेना शिंदे गटाला मोठं खिंडार; ठाकरेंचा विश्वासू शिलेदार भाजपात, काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी... (छायाचित्र @पीटीआय फोटो)
शिवसेना शिंदे गटाला मोठं खिंडार; ठाकरेंचा विश्वासू शिलेदार भाजपात, काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

Top Political News in Maharashtra : पुण्यात शिवसेना शिंदे गटातील २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. ठाकरे गटाच्या माजी…

What Prithviraj Chavan Said?
“एपस्टीनच्या मेलमध्ये ‘मोदी ऑन बोर्ड’चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव”; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा काय?

एपस्टिन फाईल्सबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नवा दावा काय?

Eknath Shinde Slams Rahul Gandhi Thane Criticism Pakistan Comments PM Modi Clean Image Prithviraj Chavan Politics
Eknath Shinde Slams Rahul Gandhi : पाकिस्तान जे सांगतं ते राहुल गांधी खरं मानतात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

राहुल गांधींनी देशाशी बेईमानी आणि देशद्रोह केल्याचा खळबळजनक आरोप करत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या युद्धविषयक विधानांचा खरपूस समाचार घेतला आहे.

Eknath Shinde Answer to Prithivraj Chavan
“पाकिस्तान प्रेम दाखवणाऱ्यांना देशाची जनता माफ करणार नाही, यांची कबर..”; पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये आपला पराभव झाला होता असं विधान केलं. ज्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.

Chief Minister Prithviraj Chavan
Prithviraj Chavan: “ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव”, भाजपाच्या टीकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

Prithviraj Chavan Op Sindoor Remark: २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये काय झाले? याची चौकशी केली जावी. तसेच ऑपरेशन सिंदूरची खरी माहिती…

Prithviraj Chavan Statement on Operation Sindoor
Video : “ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी आपण हरलो होतो, विमानं पाडण्यात आली आणि..”; पृथ्वीराज चव्हाणांचं वादग्रस्त वक्तव्य

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं. याच मोहिमेबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केलं…

ताज्या बातम्या