सोलापूर : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात मतदानाचे आकडे खाली आल्यामुळे सर्व काही ठीक नाही, अशा अपयशाचा अंदाज आल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीभ घसरली आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचे विकासाचे मुद्दे सोडून द्वेषाचे, भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींकडून होत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

सोलापुरात लोकसभेच्या प्रचारासाठी आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी, देशात भाजपविरोधी मतविभागणी टाळण्यात इंडिया आघाडी यशस्वी होत असल्याचा दावाही केला. ते म्हणाले, २०१४ पूर्वी देशात भाजपला २०-२२ टक्क्यांवार मते मिळत नव्हती. २०१४ साली त्यांना ३१ टक्के मिळाली होती. नंतर २०१९ साली पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपला ३७ टक्के मते मिळाली होती. आता ती ३० टक्क्यांपर्यंत दिसतात. विरोधकांच्या मतांमध्ये म्हणजेच भाजपविरोधी मतांमध्ये विभागणी होत गेल्यामुळे भाजापला सत्ता मिळत गेली. परंतु आता ही मतविभागणी टाळण्यात इंडिया आघाडी यशस्वी होत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “ज्यांचा एकही व्यक्ती निवडून…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

हेही वाचा – “..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र

हेही वाचा – धाराशिव : वंचितचे कुकर, एमआयएमचा पतंग आणि बीएसपीचा हत्ती, कोणाला होणार लाभ, कोणाची गुल होणार बत्ती?

वंचित बहुजन आघडीला महाविकास आघाडीबरोबर घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न झाला. परंतु ‘वंचित’कडून स्वतः प्रकाश आंबेडकर चर्चेस न येता दुय्यम फळीतील नेत्यांना पाठविले गेले आणि या दुय्यम फळीतील नेत्यांची भाषा अपमानास्पद होती. जागा वाटपात त्यांच्या अव्यवाहार्य मागण्या मान्य करणे शक्य नव्हते. मागील २०१९ साली लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र असताना त्यांना ७ टक्के मते मिळाली होती. त्यातून सोलापूरसह सात लोकसभा जागांवर भाजपविरोधी मतविभागणीचा महाविकास आघाडीला फटका बसला होता. परंतु आता त्यांच्यासोबत एमआयएम नाही. त्यामुळे ‘वंचित’च्या मतांचा टक्का तीनपर्यंत खाली येऊ शकतो, असे भाकितही चव्हाण यांनी वर्तविले.