personal information
शुबमन गिल (Shubman Gill) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमध्ये झाला. त्याच्या वडिलांना क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती. लहानपणी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. प्रशिक्षणासाठी ते मोहाली येथे राहायला गेले. त्यानंतर शुबमनला पंजाबच्या संघाकडून (Punjab Team)खेळायची संधी मिळाली. राज्यस्तरीय अंडर-१६ स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१६-१७ मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. पुढच्या वर्षी त्याला रणजी स्पर्धेमध्ये खेळायची संधी मिळाली. या दोन्ही महत्त्वपूर्ण स्पर्धोंमध्ये शुबमनने चांगला खेळ करत अनेक विक्रम केले. पुढे त्याला देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया-सीकडून खेळला.
राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये कौशल्य दाखवल्यानंतर २०१८ मध्ये शुबमन गिल अंडर-१९ विश्वचषकासाठीच्या भारतीय संघामध्ये सामील झाला. त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. झालेल्या एकूण सामन्यांमध्ये त्याने १२४.०० च्या सरासरीने ३७२ धावा केल्या. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये त्याने नाबाद १०२ धावा केल्या. शुबमन अंडर-१९ विश्वचषकामध्ये स्टार प्लेयर म्हणून झळकला. त्याच वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये शुबमन गिल या तरुण खेळाडूवर कोलकाता नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक बोली लावली. २०१८-२०२१ या काळामध्ये तो केकेआरकडून खेळला. पुढे रिटेन न केल्याने २०२२ मध्ये तो गुजरात टायटन्स या संघात सामील झाला. २०२३ च्या आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्ये त्याने तुफान फलंदाजी करत ऑरेन्ज कॅप मिळवली होती.
२०१९ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताच्या संघात शुबमन गिलचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे त्याने एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे २०२० मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. तर २०२३ मध्ये त्याला भारतीय संघातून टी-२० सामना खेळायची संधी मिळाली. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये शुबमन गिलने १८ कसोटी सामन्यांमध्ये ९६६, २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,४३७ आणि ४५ टी-२० सामन्यांमध्ये २९५ धावा केल्या आहेत. आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उत्तम खेळ दाखवल्याने भारतीय संघात त्याने जागा पक्की केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मासह सलामीवीर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. येत्या आशिया कप २०२३ मध्येही त्याचा समावेश सलामीवीर फलंदाज म्हणून करण्यात आला आहे. आशिया कपसह विश्वचषकामध्ये शुबमन दिलेली जबाबदारी पार पाडेल अशी चाहत्यांना आशा आहे.
क्रिकेटव्यतिरिक्त शुबमन त्याच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. त्याने ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या चित्रपटातील पवित्र प्रभाकर या पात्राच्या पंजाबी डबिंगसाठी आवाज दिला आहे. अनेक अभिनेत्रीशी त्याचे नाव जोडले जात आहे.
matches
55innings
55not outs
8average
59.04hundreds
8fifties
15strike rate
99.56sixes
59fours
313highest score
208balls faced
2787matches
55innings
2overs
3average
–balls bowled
18maidens
0strike rate
–economy rate
8.33best bowling
0/115 Wickets
04 wickets
0matches
32innings
59not outs
5average
35.05hundreds
5fifties
7strike rate
59.92sixes
31fours
210highest score
128balls faced
3159matches
32innings
1overs
1.1average
–balls bowled
7maidens
0strike rate
–economy rate
0.85best bowling
0/15 Wickets
04 wickets
0matches
21innings
21not outs
2average
30.42hundreds
1fifties
3strike rate
139.27sixes
22fours
60highest score
126balls faced
415matches
innings
overs
average
balls bowled
maidens
strike rate
economy rate
best bowling
5 Wickets
4 wickets
matches
114innings
111not outs
16average
39.20hundreds
4fifties
25strike rate
137.77sixes
111fours
361highest score
129balls faced
2703matches
innings
overs
average
balls bowled
maidens
strike rate
economy rate
best bowling
5 Wickets
4 wickets
शुबमन गिल News
RR vs GT: जोडी नंबर १! या आयपीएलमध्ये कोणालाच न जमलेला रेकॉर्ड सुदर्शन- गिलने करून दाखवला
IPL 2025 RR vs GT Highlights: १४ वर्षीय वैभव गुजरातवर भारी पडला! राजस्थानचा दणदणीत विजय
VIDEO: “मी गेली ३ वर्षे…”, शुबमन गिलचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा; सारा तेंडुलकरसह ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान काय म्हणाला?
KKR vs GT Highlights: गुजरात एक्स्प्रेस सुसाट! केकेआरला घरच्या मैदानावर पराभूत करत मिळवला शानदार विजय
KKR vs GT: साई सुदर्शनने रचला इतिहास! IPL २०२५ स्पर्धेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज
KKR vs GT: “मस्त दिसतो आहेस, लग्न ठरलं का?”, समालोचकाच्या प्रश्नावर गिल हसला अन् म्हणाला…
KKR vs GT Highlights: कोलकाताची शरणागती; गुजरातचा ३९ धावांनी विजयी
LSG vs GT: शुबमन गिल आणि साई सुदर्शनच्या जोडीचा मोठा पराक्रम, IPL 2025 मध्ये केला अनोखा विक्रम
GT VS SRH IPL 2025: गुजरातच्या विजयात सिराज-वॉशिंग्टन चमकले
Shubman Gill: शुबमन गिलच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं, हॉस्पिटलला इतक्या लाखांची दिली देणगी
शुबमन गिल PHOTOS
PHOTOS : गोव्याच्या बीचवर सारा तेंडुलकर बनली ‘जलपरी’, ‘या’ व्यक्तीसह दिसली व्हेकेशनचा आनंद घेताना
IND vs BAN Test : विराट ‘किंग’ तर रोहित ‘फ्लॉप’, जाणून घ्या भारतीय खेळाडूंची बांगलादेशविरुद्धची कामगिरी
Photos : वाढदिवशी शुबमन गिलने ज्या गायकाचे गाणे गायले त्याच्याच शोमध्ये पोहोचली सारा तेंडुलकर, वाईनसह केले सेलिब्रेशन, पाहा फोटो