जगातील सर्वात मोठया लोकशाहीच्या ‘उत्सवा’ला आजपासून (१९ एप्रिल) खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. अद्याप ४४१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा प्रचाराला वेग आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले नवीन जिंदाल खांद्यावर धान्याची पोती घेऊन धान्याच्या ट्रकमध्ये भरताना दिसले, तर कित्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अगदी अशक्यप्राय आश्वासनं देताना दिसत आहेत. अशातच सोलापूरच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली.

अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी बॉलिवूड, टॉलिवूडपासून ते वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना आमंत्रित केल्याचं पाहायला मिळालं. सेलिब्रेटी, इन्फ्लुएन्सर्स आणि कलाकार वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या शिवसेनेच्या शिंदे गटातील उमेदवारांचा प्रचार करतोय. अशातच काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदेंच्या प्रचाराला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या डुप्लिकेटने हजेरी लावली. काँग्रेस पदाधिकारी या खोट्या शाहरुख खानला आपल्याबरोबर घेऊन प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत आहे. या प्रचाराचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून भाजपा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता काँग्रेस आणि प्रणिती शिंदेंवर टीका करू लागले आहेत.

Supriya Sule allegation that the oppressors were rejected through ED CBI
ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दडपशाही करणाऱ्यांना नाकारले! सुप्रिया सुळे यांचा आरोप
Sushma Andhare, Devendra Fadnavis,
“देवेंद्र फडणवीसांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळेच…”, सुषमा अंधारेंची टीका; म्हणाल्या, “बाप हा बाप असतो”!
khatakhat Rahul Gandhi word Narendra Modi in loksabha election 2024
खटाखट टू टकाटक व्हाया सफाचट! आरोप-प्रत्यारोपांमध्ये यमक जुळवणाऱ्या शब्दांनी कशी रंगली लोकसभेची निवडणूक?
fir against lawyer for posting dhruv rathee video on whatsapp in vasai
ध्रुव राठीची चित्रफीत प्रसारित केल्याने वकिलाविरोधात गुन्हा ; वसईतील घटना
AAP MP Swati Maliwal and YouTuber Dhruv Rathee
ध्रुव राठी आणि ‘आप’वर स्वाती मालिवाल यांचा मोठा आरोप; म्हणाल्या, “बलात्कार आणि जीवे मारण्याची..”
Rules for political parties to use state funded media during polls Sitaram Yechury G Devarajan
“मुस्लीम, हुकूमशहा शब्द वापरु नका!” प्रसार भारतीने कोणत्या नियमांअंतर्गत विरोधकांवर कारवाई केली?
rajnath singh modi shah
२०२५ मध्ये अमित शाह पंतप्रधान होणार? अरविंद केजरीवालांच्या दाव्यावर राजनाथ सिंहांचं उत्तर; मोदींच्या निवृत्तीबाबत म्हणाले…
cm eknath shinde special attention to Nashik
विश्लेषण : नाशिक मतदारसंघाकडे मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याचे कारण काय? ही जागा महायुतीसाठी आव्हानात्मक का ठरतेय?

भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या डुप्लिकेट शाहरुख खानचे प्रणिती शिंदेंचा प्रचार करतानाचे फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत काँग्रेसवर टीका केली आहे. पूनावाला यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस पक्ष उघडपणे लोकांची फसवणूक करत आहे. तसेच त्यांनी या पोस्टमध्ये निवडणूक आयोगालाली टॅग केलं आहे. पूनावाला यांनी म्हटलं आहे की, सर्वेक्षणाचे बनावट अहवाल, भारतविरोधी गोष्टी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बनवलेले डीपफेक व्हिडीओ आणि आता हे (डुप्लिकेट शाहरुख खानला घेऊन काँग्रेस उमेदवाराचा प्रचार) करून काँग्रेस लोकांची फसवणूक करत आहे.

हे ही वाचा >> संजय राऊत नवनीत राणांबाबतच्या विधानावर ठाम! “नाचीला ‘नाची’ नाही तर मग…?”

मुंबई भाजपाचे प्रवकते सुरेश नाखुवा यांनी यांनीदेखील डुप्लिकेट शाहरुख खानचा प्रणिती शिंदेंचा प्रचार करतानाचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. यासह त्यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस पक्ष खोटे सर्वे दाखवून, फेक कॅम्पेन करून लोकांची फसवणूक करतोय.