23 January 2018

News Flash

बडबडे आणि करकरे

या ट्रम्प यांनी निवडणुकीत भरमसाठी आश्वासनं दिली होती.

गिरीश कुबेर | Updated: December 24, 2016 3:12 AM

डोनाल्ड ट्रम्प आणि बराक ओबामा

अमेरिकेत आपले मंत्री कोण असतील हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार निर्वाचित राष्ट्राध्यक्षास असतो. भले ते निवडताना ट्रम्प यांनी टोपी फिरवलेली असू दे, पण म्हणून त्यांच्या अधिकारावर काही गदा आणता येत नाहीपण तरी शहाणा माणूस काही उपाय करू शकतो..

राजकारण करणाऱ्यांचे दोन प्रकार असतात. एक असतो तो जे काही करणार आहोत त्याची हवा तयार करतो. आपण यंव करणार.. अमुक प्रश्न चुटकीसरशी सोडवणार.. तमुक समस्येवर २४ तासांत तोडगा काढणार..याला सरळ करणार..त्याचा बीमोड करणार.. वगरे वगरे. आपल्या संभाव्य कार्यक्षमतेचा डंका पिटण्याची यांची क्षमता इतकी असते की  ती पाहून समाजातल्या एका वर्गाला या समस्या खरोखरच सुटल्या.. असंच वाटायला लागतं. हे असं वाटायला लावणं हेच त्या नेत्याचं कौशल्य.

दुसरा वर्ग असतो तो असं काही बोलत नाही. छाती पिटून आपली क्षमता काय आहे, आपण काय करू इच्छितो, काय करणार आहोत. वगरे वगरे काहीही बडबड करत नाही. पण तरी त्याच्या वागण्यातनं लोकांचा त्यावर विश्वास बसतो. या दुसऱ्या गटातल्या राजकारण्यांला आपण कोणत्या रस्त्यानं जाणार आहोत, वाटेत कुठे आणि किती आकाराचे गतिरोधक आहेत..वगरे सगळ्याचा अंदाज असतो. त्यामुळे हा उगाच काही मोठी स्वप्न दाखवण्याच्या फंदात पडत नाही. आहे त्या परिस्थितीत जितकं काही चांगलं करता येईल तितकं आपण करू इतकंच त्यांचं म्हणणं असतं आणि त्याच्या प्रांजळपणावर नागरिकांचा विश्वास असतो. या विश्वासाला पहिल्याच्या तुलनेत या वर्गातले राजकारणी सहसा तडा जाऊ देत नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प आणि बराक ओबामा ही अनुक्रमे या दोन प्रकारांतली उदाहरणं. वरचं वर्णन वाचून अनेकांच्या मनात अनेक अन्य नावं आलीही असतील. परंतु इथं आपण विचार करणार आहोत तो प्रामुख्यानं ट्रम्प आणि ओबामा यांचाच. हे अशासाठी नमूद केलं की उगाच कोणाला काही वाटून समाजमाध्यमातल्या टोळ्यांच्या हाती कोलीत मिळायला नको. असो.

तर या ट्रम्प यांनी निवडणुकीत भरमसाठी आश्वासनं दिली होती. परत त्यातही त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे ही आश्वासनं देताना त्यांनी एक चातुर्य दाखवलं. हे चातुर्य म्हणजे आपण जी काही आश्वासनं देतोय ती पूर्ण करणार कशी हे काही त्यांनी सांगितलं नाही. (आता तेही अनेकांना ओळखीचं वाटत असेल तर त्याला इलाज नाही.) त्या फंदातच ते पडले नाहीत. या आश्वासनांच्या जोडीला ते विद्यमान व्यवस्था किती वाईट, अकार्यक्षम आणि गरिबांचं कल्याण करणारी कशी नाही हेच मोठमोठय़ांदा सांगत राहिले. डेमोक्रॅटिक पक्ष.. म्हणजे त्या पक्षाच्या उमेदवार हिलरी िक्लटन.. या बडय़ा भांडवलदारांचंच हित पाहणाऱ्या आहेत, मोठमोठय़ा बँकर्सचीच फक्त त्यांना काळजी आहे, त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली तर श्रीमंत अधिक श्रीमंत होतील आणि गरिबांची पोटं अधिकच खपाटीला जातील.. माझं तसं नाही. मी हे सगळं बदलून टाकणार आहे.. बडय़ा उद्योगपती, बँकर्स यांना सरळ करणार आहे.. माझ्या राजवटीत त्यांना काहीही स्थान नसेल. वगरे वगरे.

देश आणि नागरिक कोणत्याही देशातले असोत. त्यांना आपल्यापेक्षा ज्यांचं बरं, उत्तम आणि अतिउत्तम चाललं आहे अशांना कोणी रट्टे दिले तर आनंद होत असतो. आपल्याकडे जे काही हवं ते नाही यातून निर्माण होणारं या वर्गाचं दुख त्यांच्याकडेही त्यांना हवं ते नाही.. या वास्तवानं नेहमीच दूर होत असतं. असा वर्ग हा नेहमीच वाहवत जाणारा असतो आणि चतुर राजकारणी या वाहून जाणाऱ्या वर्गाच्या प्रवाहात आपली होडी रेटत असतो. (आता हे देखील काही जणांना ओळखीचं वाटलं तर मात्र कठीण आहे) ट्रम्प यांनी बरोबर हे केलं. नाही रे वर्गाला आहे रे वर्गाच्या विरोधात असं काही उभं केलं की तो वर्ग बहुसंख्येनं ट्रम्प यांच्या मागे गेला आणि ते निवडून आले.

ट्रम्प यांनी सत्ता हाती घ्यायला महिनाभराचा अवकाश आहे. २० जानेवारीला ते अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतील. हा मधला काळ ते आपले संभाव्य मंत्री निवडण्यात घालवतायत. या काळात त्यांनी काही जणांची निवड जाहीर केलीये. ज्या ज्या वर्गाच्या विरोधात ट्रम्प यांची राजकीय भूमिका होती, त्या त्या वर्गातल्या धनाढय़ आणि बलाढय़ यांना त्यांनी बरोब्बर महत्वाच्या पदांसाठी निवडलंय. म्हणजे आपल्या भूमिकेच्या उलट त्यांची कृती आहे. असो. (हे देखील ओळखीचं वाटतंय का, असं याबाबत विचारणं योग्य नाही.) ट्रम्प बडय़ा बँकर्सच्या विरोधात बोलले होते. या बडय़ा बँकर्सना त्यांनी मंत्रीमंडळात घेतलंय. ते बडय़ा उद्योगपतींच्या विरोधात बोलले होते. अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी त्यांनी या उद्योगपतींना निवडलंय.

हे सर्व मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या डोळ्यादेखत सुरू आहे. पण त्यांचा पक्ष निवडणुकीत हरलाय. तेव्हा ते आता काही करू शकत नाहीत. आपले मंत्री कोण असतील हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार निर्वाचित राष्ट्राध्यक्षास असतो. भले ते निवडताना ट्रम्प यांनी टोपी फिरवलेली असू दे, पण म्हणून त्यांच्या अधिकारावर काही गदा आणता येत नाही.

पण तरी शहाणा माणूस काही उपाय करू शकतो.

ओबामा यांनी तेच केलंय.

झालंय असं की या निवडणुकीत ट्रम्प यांनी अमेरिकी कंपन्यांचं ऊर्जा धोरण हा मोठा मुद्दा केला होता. अमेरिकी कंपन्यांना तेल उत्खननाचा अधिकार असायला हवा, या कंपन्यांचा मोठा विस्तार व्हायला हवा, अरबांकडून तेल घ्यायचं नसेल तर देशांतर्गत उत्खनन वाढायला हवं..अशी ट्रम्प यांची भूमिका. ही त्यांची मतं नुसती ऊर्जाविषयक धोरणांची असती तर एकवेळ ते समजून घेता आलं असतं. पण या ऊर्जाविषयक मतांच्या जोडीला ट्रम्प हे पर्यावरण रक्षण वगरे कल्पना मानतच नाहीत. वसुंधरेचं तापमान वाढतंय यावर त्यांचा विश्वास नाही. पर्यावरण रक्षण, पृथ्वीची तापमान वृध्दी वगरे सर्व थोतांड आहे..डेमोक्रॅटिक पक्षानं आपले हितसंबंध राखण्यासाठी हे मुद्दे तयार केलेत, असं ट्रम्प जाहीर बोलत.

याचा अर्थ उघड आहे. तो म्हणजे सत्ता मिळाल्यावर ट्रम्प तेल कंपन्यांना वाटेल तशी मुभा देणार. त्यात ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्रीपदासाठी रेक्स टिलरसन यांचं नाव मुक्रर केलंय. जगातल्या सगळ्यात मोठय़ा, महाप्रचंड एक्झॉन मोबील या कंपनीचे ते मुख्याधिकारी. याआधी धाकल्या बुश यांच्या अध्यक्षकाळात त्यांच्या मिंत्रमंडळात तब्बल २७ मंत्री तेल कंपन्यांशी संबंधित होते. कोंडोलिसा राईस, डिक चेनी वगरे सर्वच जण याच एक्झॉन मोबील कंपनीशी संबंधित. आणि आता त्यांच्याच पक्षाच्या ट्रम्प यांनी थेट या कंपनीच्या प्रमुखालाच मंत्रिमंडळात घ्यायचा निर्णय जाहीर केलाय.

याचा अर्थ उघड आहे. तेल कंपन्या मोकाट सुटणार.

हे स्पष्ट झाल्यावर ओबामा यांनी आपले अध्यक्षीय अधिकार वापरून एक जबरदस्त निर्णय घेतलाय. उत्तर गोलार्ध, अलास्काची सामुद्रधुनी, अटलांटिक सागरातील बेटांचा परिसर आदी महत्त्वाच्या ठिकाणी यापुढे कधीही तेल वा नसíगक वायूसाठी उत्खनन करता येणार नाही, असा निर्णय  ओबामा यांना घेतला. त्यासाठी त्यांनी थेट ६३ वर्षांपूर्वीच्या ड४३ी१ उल्ल३्रल्ली३ल्ल३ं’ रँी’ऋ छंल्ल२ि अू३ विस्मरणात गेलेल्या कायद्याचा आधार घेतला. या कायद्याचं वैशिष्टय़असं की त्याच्या आधारे अमेरिकी अध्यक्षाला पर्यावरण रक्षणासाठी कोणत्याही भूप्रदेशावर कायमची उत्खनन बंदी घालता येते. ही साधी प्रशासकीय निर्णयप्रक्रिया नाही. त्यामुळे पुढच्या अध्यक्षाला ती बदलता येत नाही. बदलायचीच असेल तर त्याला संपूर्ण घटनादुरुस्ती करावी लागते. म्हणजे राज्यांनीही बहुमतानं त्याला मान्यता द्यावी लागते.

आता पर्यावरण रक्षण हे प्रकरण इतकं नाजूक, संवेदनशील आहे की अध्यक्षानं हा कायदा बदलण्यासाठी जरा जरी प्रयत्न केला तरी त्याविरोधात रान उठू शकतं. म्हणजेच ट्रम्प यांना या बंदीविरोधात काहीही करता येण्याची शक्यता नाही. कायद्याच्या एका फटकाऱ्यात ओबामा यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याचे हात बांधून टाकलेत. परत जाता जाता इतका मोठा निर्णय घेऊन त्यांनी ट्रम्प यांची गोची तर केलीच. पण पर्यावरण रक्षणासाठी इतकं काही केल्याचं पुण्यदेखील पदरी पाडलं.

हा फरक असतो. राजकारण्यातल्या बडबडे आणि करकरे यांच्यात. तो  का समजून घ्यायचा हे सांगायची गरज नसावी, बहुधा.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

First Published on December 24, 2016 3:12 am

Web Title: american ministry politics donald trump barack obama
 1. G
  Gajanan Masurkar
  Dec 24, 2016 at 4:26 am
  Apratim lekh
  Reply
  1. M
   Mohan kale
   Dec 24, 2016 at 6:21 am
   Nice work sir je samjaych te samjal.......thanks
   Reply
   1. P
    Pramod
    Dec 25, 2016 at 4:21 am
    ओबामांचे फक्त काही दिवस शिल्लक असताना त्यांनी असा निर्णय घेणे योग्य आहे का याबद्दल शंका वाटते याविरुद्ध काहीच करता येणार नाही हे चूक आहे. एका अमेरिकी सेनेटरची प्रतिक्रिया पहा: Sen. Ted Cruz (R-Tex.) responded sharply on Twitter: “Yet another Obama abuse of power. Hopefully, on[e] that will be reversed…exactly one month from today” after Trump’s inauguration. अमेरिकी संसदेला हा निर्णय रद्द करण्याचा अधिकार आहे.
    Reply
    1. Ramdas Bhamare
     Dec 24, 2016 at 7:53 am
     एकाच वेळी इतक्या शलजोडीतल्या ? भक्तांवर थोडी तरी दया करा !
     Reply
     1. Ramdas Bhamare
      Dec 24, 2016 at 7:56 am
      काही विद्वानांना लोकसत्ताच्या बातम्या , अग्रलेख आजिबात आवडत नाहीत , तरी ते पुन्हा पुन्हा लोकसत्ता का वाचतात हे एक कोडेच आहे !
      Reply
      1. R
       ravindrak
       Dec 24, 2016 at 5:17 am
       करकरे आता नाहीत,ते डोळे मिटून कां बंद करून,वरून जी अन्य येई ती निमूट पाने करत होते !!त्यांनी आणलेल्या विधेयकाला,पक्ष प्रमुखांनी सर्वांदेखत फाडले ( जे बडबडे,आताही बडबडत असतात,दहा वर्षात संसदेत तोंड उघडले नाही फक्त पक्षात आणि विद्यापीठात बडबडले)!!!काही टोळ्यांना हे आवडणार नाही ,काय करणार ?? कालाय तस्मै नमः ( संस्कृत आहे म्हणून परत माफी )
       Reply
       1. R
        Raj
        Dec 24, 2016 at 5:07 am
        संपादक साहेब, कृपया एक लेख "मुकेशबाबांचा" ६ महिने फुकट सुरु असणारा "जीओ भंडारा" आणि MRTP Act यांवर लिहा .
        Reply
        1. S
         sandeep
         Dec 24, 2016 at 5:36 am
         आम्हाला हे सगळं ओळखीचं वाटत असेल तर ते ठीक आहे तुम्ही ट्रम्प ची तुलना मोदिंशी केली हे देखील ठीक पण 10 वर्षाच्या काळात भ्रष्टाचार सोडून काहीही न करणाऱ्या काँग्रेस ची तुलाना ओबामा शी करणे निव्वळ हास्यास्पद
         Reply
         1. S
          sandeep
          Dec 24, 2016 at 5:38 am
          प्रत्येक गोष्टीत भाजप आणि मोदींना आणण्याच्या तुमच्या बालबुद्धी चे कौतुक करावे तेवढे थोडे आहे
          Reply
          1. S
           sangrams
           Dec 25, 2016 at 7:05 am
           देश आणि नागरिक कोणत्याही देशातले असोत. त्यांना आपल्यापेक्षा ज्यांचं बरं, उत्तम आणि अतिउत्तम चाललं आहे अशांना कोणी रट्टे दिले तर आनंद होत असतो. आपल्याकडे जे काही हवं ते नाही यातून निर्माण होणारं या वर्गाचं दुख त्यांच्याकडेही त्यांना हवं ते नाही.. या वास्तवानं नेहमीच दूर होत असतं.
           Reply
           1. M
            milind
            Dec 24, 2016 at 1:36 pm
            कुबेर साहेबांना मोदी नको आहेत हे स्पष्ट आहे. कुणाचे पोट जरी बिघडले तरी कुबेर त्याचा संबंध मोदींशी जुळवणार. फक्त मोदी नको तर कोण दुसरे ते कधी सांगत नाहीत. फक्त घेतलेल्या निर्णयांवर टीका करता येते पण काय निर्णय घ्याल , कसे घेणार, कोण करणार, हे कधी सांगत नाहीत. भंपक
            Reply
            1. S
             Shriram
             Dec 24, 2016 at 6:38 am
             बडबडे करकरे यांच्या जोडीला माध्यमातून 'कुरकुरे' ही जमात सुद्धा असते. त्यांना लोकशाही प्रक्रियेने निवडून आलेले ट्रम्प किंवा मोदी हे नेते सतत खुपत असतात , तेव्हा ते त्यांच्याबद्धल सतत कुरकुरत असतात निवडणुकांच्या वेळी या लोकांनी त्यांना पाडण्याचा भरपूर प्रयत्न केलेला असतो पण आपला पगार काय आपण कोणाला विरोध करतोय याचा अंदाज नसल्याने ते ढुंगणावर आपटलेले असतात. थोडी कळ जिरल्यावर ते निवडून आलेल्याला "मै जीना हराम कर दूंगा "अशी धमकी मनोमन देतात आणि त्या उद्योगाला लागतात.त्यातून त्यांना लाभही होतो.
             Reply
             1. S
              Shriram
              Dec 24, 2016 at 10:26 am
              राज्यसभेत विधेयक अडकणार म्हटल्यावर ते अर्थविषयक आहे असे म्हणून लोकसभेतच पारित करून लागू केले जाते. तशीच काहीतरी आयडिया मोदी ट्रम्प याना तेल उत्साठी देतील त्यावेळी लेखक हात चोळीत बसतील.
              Reply
              1. S
               sumeet
               Dec 24, 2016 at 3:27 am
               उत्तम लेख गिरीशजी, जगात घडामोडीच्या मागे नेमके काय असते ते तुमच्या लेखातून उत्तमरीत्या आकलन होते. असेच लेख लिहीत राहा
               Reply
               1. U
                Unison
                Dec 24, 2016 at 10:06 am
                अहो...फक्त logical Indian नाव लावल्याने प्रतिक्रिया logical होत नसते.
                Reply
                1. U
                 Unison
                 Dec 24, 2016 at 10:53 am
                 अहो, लोकशाही मार्गाने जरी निवडून आले तर टीका करू नये असं थोडीच आहे...परंतु गिरीश कुबेर सारखे लोक अनाठायी टीका करतात...उदाहरणार्थ शिवाजीराजांचं स्मारक खरंच आवश्यक आहे का??..तर नाही...आधी गडकिल्ले ठीक करा...परंतु असे विषय मांडण्याऐवजी मोदींवर ्लिनाथी कशी करता येईल हे बघतात...वरती ज्या अमेरिकी कायद्याचा उल्लेख केला त्याबद्दल अधिक माहिती देता आली असती...पण त्याऐवजी मोदी कसा वाईट हे अप्रत्यक्षपणे सुचवण्यात ते धन्यता मानतात..
                 Reply
                 1. U
                  Unison
                  Dec 24, 2016 at 12:05 pm
                  आजकाल रविवार हा सगळ्यात सुखाचा दिवस म्हणावा लागतो....कारण पप्पूच्या चमच्यांची स्तोत्रे, कवने, घोषणा, नयनरम्य फुलांचे ताटवे, नवकविता, सडकछाप विनोद, राष्ट्रवादीच्या एका नेत्याशी नामसाधर्म्य सांगणा-याचे नवनवे दाखले व जागते रहो म्हणत सगळ्यांची झोप खराब करणारे लोक यांच्यापासून थोडीशी विश्रांती मिळते...गंमत अशी की रविवारी किंवा शनिवारी येणा-या लोकरंग/चतुरंग मधील लेखावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत नाही...बहुधा तिथे मोदींचा अभाव असावा किंवा मोदींचं नाव घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देण्याची इच्छाच होत नसावी...अहो पण जरा बघा...आशुतोष जावडेकर किती समर्पक लिहिताय...राहुल रानडे संगीतावर लिहिताय...दिनेश गुणे अपरिचित व्यक्तिरखा समोर आणताय...त्यांनाही जरा कळू दे त्यांचे लेख कसे वाटले ते...मोदी/भाजपा/कॉंग्रेस/पप्पू यापलीकडेही जग आहे...बुकमार्क मध्ये नवनवीन पुस्तकं येताय ती शोधा ...वाचा...गिरीश कुबेर आता पुतिन वर पुस्तक लिहिताय ते बघा...मोदींना झोडपायला आठवड्याचे इतर दिवस आहेत की...रविवारच्या पूर्वसंध्येला सर्वांसाठी...
                  Reply
                  1. U
                   Unison
                   Dec 24, 2016 at 10:45 am
                   तुम्ही तुमच्या कोषात गुरफटून राहा...enjoy
                   Reply
                   1. U
                    Unison
                    Dec 24, 2016 at 11:23 am
                    ते तुम्ही पप्पूच्या भगिनीला का विचारत नाही??
                    Reply
                    1. U
                     Unison
                     Dec 24, 2016 at 7:51 am
                     गिरीश कुबेर, तुमच्या मनोवृत्तीचे खरंच नवल वाटते..मोदींच्या मागे १४ वर्षांचा प्रत्यक्ष प्रशासनाचा व पक्षीय राजकारणाचा अनुभव आहे...आणि RSS च्या माध्यमातून सामाजिक कार्यांचा अनुभव आहे...Donald trump तर राजकारणात पूर्ण नवखे आहेत...हे तुम्ही सोयीस्कररित्या विसरतात..मोदी सलग तीन वेळा निवडून येतात ते उगीच नव्हे...जनतेला झालेले बदल दिसत असतात...नरेंद्र मोदींना Donald trump सारखं अर्वाच्य, बोलताना कुणीही पाहिलेलं नाही...आणि सर्व नेत्यांनी ओबामा सारखंच असलं पाहिजे असा अट्टहास का???...प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं..एवढ्या सगळ्या नेत्याना दोनच गटात बसवण्याचा कसला आटापिटा??..सध्याचे पत्रकार मोदींना trump सारखं दाखवायचा आटोकाट प्रयत्न करतात...पण ते कधीही होणं शक्य नाही...मोदींच्या मागे त्यांनी गुजरातमध्ये केलेल्या सक्षम कामगिरीचं भक्कम पाठबळ आहे...(आणि हो...गोध्रासकट)..
                     Reply
                     1. S
                      sanjay telang
                      Dec 24, 2016 at 11:13 am
                      धीरूभाई टॅक्स चोरी प्रकरणाची आठवण होतेय. मनमोहनसिंगांची कारकीर्द ह्या पद्धतीची होती असा काहीसा अर्थ निघतोय. राडिया टेप्स मध्ये बरेच काही आहे. पण बिचारे ना बोलताच त्यांना बडबडे संबोधलय. खरोखर अशा शाल जोडीतल्या देणे ते सुद्धा इतक्या वर्षांनी शोभत नाही.
                      Reply
                      1. Load More Comments