News Flash

स्त्री आरोग्यविमा

समूह आरोग्य विम्यातील अटी व शक्यतांनुसार आरोग्य विमा ठरावीक खर्चाचा विचार करतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

* महिलांसाठी आरोग्य विम्याचे हप्ते पुरुषांपेक्षा स्वस्त आहेत. किमान १००० ते २५०० रुपये वार्षिक फरक स्त्री-पुरुष हप्त्यांच्या दरात असतो.

* समूह आरोग्य विम्यातील अटी व शक्यतांनुसार आरोग्य विमा ठरावीक खर्चाचा विचार करतो. त्यामुळे ‘सर्वसमावेशक’ (Comprehensive) आरोग्य विमा घेणे गरजेचे आहे.

* तरुण वयात आरोग्य विमा घेतल्याने मोठय़ा विमा राशीचे संरक्षण संग्रहित करणे सहजसाध्य होते.

* स्त्रीविषयक आजारांना विशेष योजनांद्वारे सुरक्षा कवच घेणे.

* आजारपणातील खर्च स्त्री-पुरुषांनुसार कमी किंवा जास्त नसतो. त्यामुळे स्त्रियांनी चलनवाढ, स्वतचे वय, आईवडिलांची आजारविषयक पाश्र्वभूमी लक्षात घेऊन विमा राशी ठरवावी.

* ‘अर्थ’साक्षरता ही शिक्षणाइतकीच महत्त्वाची आहे, जेणे करून ‘संपूर्ण कुटुंब’ अभिप्रेत आर्थिक स्वप्ने साकारू शकते हे आवर्जून लक्षात घेणे.

* आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणे आणि आर्थिक निर्णयात सहभागी होणे दोन्ही काळाच्या गरजा आहेत. स्त्रियांची अनास्था त्यांच्या स्वतसाठी, कुटुंबाच्या भविष्यासाठी धोकादायक आहे.

* आयकर ‘कलम ८० डी’ द्वारे आरोग्य विमा हप्ता सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे आपले पालक आणि स्वतचे कुटुंब यांनाही सर्वसमावेशक विमाछत्रात स्त्रिया सामावून घेऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:30 am

Web Title: health insurance for women in india
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : ऊर्जित गुंतवणूक सुरक्षितता..
2 ‘डी-स्ट्रीट’चे मर्म.. :  ध्यान लागले ‘श्रीरामा’चे!
3 फंड विश्लेषण : जागून ज्याची वाट पाहिली!
Just Now!
X