av-06फंडाविषयक विवरण
फंड प्रकार    :    समभाग गुंतवणूक
जोखीम प्रकार     :    समभाग गुंतवणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक    :    फंड घराण्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार या फंडाचा ८० टक्के निधी लार्ज कॅप, १५ टक्के मिड कॅप व ५ टक्के स्मॉल कॅपमध्ये गुंतविला जातो. एस अँड पी बीएसई १०० हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.    .
फंड गंगाजळी    :     फंडाची मालमत्ता ८३६ कोटी रु. ३०/०६/२०१५ रोजी
व्यवस्थापन    :    यूटीआय म्युच्युअल फंडात मागील १९ वर्षांपासून कार्यरत स्वाती कुलकर्णी या फंडाच्या निधी व्यवस्थापिका असून यूटीआयच्या कार्यकारी उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत. मुबई विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी व वित्तीय व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी सीएफए ही अर्हता प्राप्त केली आहे. त्या सीएआयआयबीच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. यूटीआयमध्ये सुरवातीच्या.काळात समभाग विश्लेषक म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर २००४ पासून त्या निधी व्यवस्थापिकेच्या भूमिका बजावत आहेत.
पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
अन्य माहिती    :    फंड घराण्याच्या http://www.utimf.com या संकेतस्थळावरून थेट खरेदी वा फंड विक्रेत्यामार्फत. किमान पाच हजार एका वेळेस किंवा अथवा किमान एक हजाराच्या एसआयपीने या फंडात गुंतवणूक करता येते. गुंतवणूक  केल्यापासून एका वर्षांच्याआत बाहेर पडल्यास एक टक्का निर्गमन शुल्क लागू.

जानेवारी १९९३ मध्ये अस्तित्वात आलेली यूटीआय मास्टरग्रोथ युनिट स्कीम, काही बदलांसहित २० मे २००९ पासून यूटीआय टॉप १०० या नावाने ओळखली जाऊ लागली. हा फंड प्रामुख्याने जरी लार्ज कॅप गुंतवणूक करणारा फंड असला तरी मिड कॅप व स्मॉल कॅप समभाग गुंतवणुकीसाठी वज्र्य समजले जात नाहीत. मागील एका वर्षांचा जर गुंतवणुकीचा कल अभ्यासला तर बहुसंख्य गुंतवणूकदारांनी मिड कॅप व मल्टीकॅप प्रकारच्या फंडात गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीवर चांगला परतावादेखील मिळाला आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत  मर्यादित जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी यूटीआय टॉप १००ची शिफारस करावीशी वाटते.
निधी व्यवस्थापनाने आíथक आवर्तनाच्या दिशा बदलामुळे भविष्यात चांगली कामगिरी अपेक्षित असलेल्या बँका, सीमेंट, वाहन उद्योग आदी उद्योगक्षेत्रांवर आपली मदार राखत संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. तर माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू या उद्योगात संदर्भ निर्देशांकापेक्षा कमी गुंतवणूक केली आहे. निधी व्यवस्थापिका स्वाती कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘‘देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम लक्षात घेऊन फंडातून काही उद्योगक्षेत्रात संदर्भ निर्देशांकाहून अधिक तर काही उद्योगक्षेत्रात संदर्भ निर्देशांकाहून कमी गुंतवणूक केली आहे. जेणेकरून या घटनांच्या पडसादाची जोखीम व परताव्याचा दर यांचा समतोल साधत सशक्त गुंतवणूक पर्याय उपलब्ध केला जाईल.’’
परंतु ‘फेड’कडून अपेक्षित असलेली अमेरिकेतील व्याजदर वाढ जेव्हा केव्हा होईल याचा परिणाम जागतिक शेअर बाजारात होणे अपेक्षित आहे. त्यावेळी माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण क्षेत्रातीलगुंतवणूक फंडाच्या मालमत्तेचे मूल्य घसरण्यापासून सावरेल. या फंडाचा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो अर्थात वर्षभरातील खरेदी विक्रीचे फंडाच्या एकूण मालमत्तेशी गुणोत्तर १६ टक्के आहे. हे प्रमाण निधी व्यवस्थापक हे खरेदी-विक्री करून नफा कमावण्यापेक्षा दीर्घकालीन गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात हे दिसून येते. हे ‘बाय अँड होल्ड’ धोरण अवलंबिणारा हा फंड आहे. लार्ज कॅप फंड गटात हा सरासरीपेक्षा कमी जोखीम घेत सरासरीहून अधिक परतावा दर असलेला फंड म्हणून याची ओळख आहे. जोखीम व परताव्याचा दर यांचा समतोल साधणारा हा फंड एसआयपी व एकाच वेळी मोठी गुंतवणूक या दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीस योग्य असल्याने याची शिफारस केली आहे.
mutualfund.arthvruttant@gmail.com