News Flash

अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा ताबा घेण्यास केली सुरुवात; २३.५ टक्के हिस्सेदारीचा व्यवहार पूर्ण

दोन परदेशी कंपन्यांकडील २३.५ टक्के वाटा अदानी समूहाने घेतला ताब्यात

कोणती विमानतळं अदानी समूहाकडे?

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत.  लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही अदानी समूहाला विकण्यासंदर्भात २०१९ साली फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात  भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 8:09 am

Web Title: adani completes purchase of 23 point 5 percent stake in mumbai international airport scsg 91
Next Stories
1 तेजीला खंड
2 सप्ताहातील चार दिवस कामाचे; तर सुटीचे तीन दिवस
3 तेजी सलग सहाव्या सत्रात
Just Now!
X