News Flash

‘अरिवद’चे मुंबई परिसरात पाचवे दालन

अरिवद लिमिटेड या एका आघाडीच्या एकात्मिक टेक्स्टाइल व ब्रँडेड अ‍ॅपरल कंपनीने वसई येथे नवे दालन सुरू केले.

| November 6, 2013 05:03 am

अरिवद लिमिटेड या एका आघाडीच्या एकात्मिक टेक्स्टाइल व ब्रँडेड अ‍ॅपरल कंपनीने वसई येथे नवे दालन सुरू केले. यामध्ये सर्वोत्तम फॅशन ब्रँड एकाच छताखाली मिळणार आहेत. हे स्टोअर जिग्नेश निवास, अम्बाडी रोड कॉर्नर, स्टेशन रोड, वसई (पश्चिम) येथे आहे.
हे कंपनीचे भारतातील १२२वे तर महाराष्ट्रातील १५वे स्टोअर आहे. यानिमित्ताने कंपनीने १५० दालनांचे उद्दिष्टय़ जाहिर केले आहे. कंपनीची सध्या देशभरात १२२ दालने आहेत.
यावेळी अरिवद लिमिटेडच्या किरकोळ विक्री विभागाचे प्रमुख पी. एस. राजीव म्हणाले की, अरविंदची पाचवी शाखा वसईमध्ये (मुंबई) सुरू करून आम्ही या परिसरात आमचे अस्तित्व ठळक करत आहोत. आíथक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आम्हाला वाढीसाठी मोठी संधी आहे आणि त्यामुळे देशातील या एका धावपळीच्या शहरात विस्तार करण्यामध्ये आम्ही सातत्य राखणार आहोत.
या आíथक वर्षांअखेर १५० दालनांचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने कंपनी योग्य प्रकारे वाटचल करत आहे.
काम करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी असल्याने, मुंबई आम्हाला बदलती फॅशन व स्टाइल पुरवण्याची संधी मिळेल व त्यामुळे त्यांच्या गरजा सहज पुरवल्या जातील.
द अरिवद स्टोअर ग्राहकांसाठी फॅब्रिक व रेडीमेड असे दोन्ही पर्याय देते. कंपनी ग्राहकांचा खरेदीचा अनुभव लक्षणीय बदलते, असा दावा करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 5:03 am

Web Title: arivad opens fifth center in mumbai
Next Stories
1 ‘सेन्सेक्स-निफ्टी’ची पताका!
2 अलविदा संवत..
3 सणोत्सवातील मागणी भागविण्यासाठी सहा टन सोने आयातीचा ‘एसटीसी’चा निर्णय
Just Now!
X