गेल्या आठ वर्षांतील सुमार आर्थिक मंदी वेशीवर असल्याची वर्दी बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने दिली आहे. येत्या वर्षभरात अवतरणारी ही मंदी ऑक्टोबर २०११ नंतरची भीषण आर्थिक मंदी असेल, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिका-चीन दरम्यानच्या व्यापार युद्धाचा उल्लेख करत आघाडीच्या आंतरराष्ट्रीय बँकेने जागतिक स्तरावर ही अनेकांसाठी जोखीम असेल, असे नमूद केले आहे.

बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने चालू महिन्याच्या सुरुवातीला केलेल्या जागतिक निधी व्यवस्थापकांच्या सर्वेक्षणातून ही भीती व्यक्त झाली आहे. तब्बल ५५३ अब्ज डॉलरचे निधी व्यवस्थापन करणाऱ्या जगभरातील आघाडीच्या २२४ फंड व्यवस्थापकांनी याबाबतच्या सर्वेक्षणात आगामी अर्थव्यवस्थेबाबतचे आपले मत नोंदविले.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक निधी व्यवस्थापकांनी, आस्थापनांनी त्यांचा ताळेबंद भक्कम करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. अशा ताळेबंदासाठी आस्थापनांनी समभाग पुनर्खरेदीऐवजी रोख रकमेचा उपयोग करावा, असे गुंतवणूकदार सुचवितात, असेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमिस्ट’च्या पाहणीत अमेरिकेत पुढील दोन वर्षांत मंदीसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका अधोरेखित करण्यात आला आहे. जागतिक महासत्तेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने केलेल्या काही उपाययोजनांमुळे मंदीसदृश स्थिती तूर्त रोखली गेली आहे, असे नमूद केले